सौ.पायल विवेक कापसे यांची विदर्भ कुर्मी समाज प्रदेशाध्यक्ष (महीला प्रकोष्ठ) पदी निवड

83

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10फेब्रुवारी):-विदर्भ कुर्मि समाज ची केंद्रीय कार्यकारिणीची सभा दि.4 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे संपन्न झाली.

या सभेत मध्ये महीला विभागाची प्रदेश अध्यक्ष पदी सौ.पायल विवेक कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या पुर्वि पायल कापसे यांनी समाजाच्या चिमुर तालुकाध्यक्ष, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळली असुन त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष पदी निवडीचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला.

या सोबतच त्या मानवाधिकार संघटन दिल्लीच्या विदर्भ अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत असून सृश आसरा फाऊंडेशन व अ माॅडल्स ड्रिम्स च्या मुख्य संचालक ही आहेत.सौ. पायल कापसे यांची निवड झाल्याबद्दल कुर्मी समाजाच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.