धरणगाव येथे माँसाहेब जिजाऊंचे स्मारक होणार पालकमंत्री गुलाबराव पाटील

32

🔸धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन..

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.10फेब्रुवारी):-जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळेस सकल मराठा समाजातर्फे धरणगाव येथील जळगाव एरंडोल रस्त्यावर चौफुलीला मा जिजाऊ यांचे नाव देण्यात आले असून तसा नगरपालिकेने ठराव सुद्धा केला आहे त्या ठिकाणी मा जिजाऊंचे स्मारक व्हावे अशी मागणी धरणगाव सकल मराठा समाजाने केली असता लवकरच धरणगाव येथे मा जिजाऊंचे स्मारक केले जाईल त्याच्यासाठी जी मदत लागेल ती मदत मी निश्चित करेल असे आश्वासन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी दिल.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी जी पाटील साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी एम पाटील सर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन,पाटील समाज अध्यक्ष नाना पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी,राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपा तालुका प्रमुख जिजाबराव पाटील,भानुदास आप्पा विसावे,जीवन आप्पा बयस,राष्ट्रवादीचे दीपक भाऊ वाघमारे,धरणगाव नगरपालिकेचे गटनेते विनय भावे,कैलास माळी सर,विजय महाजन, वासुदेव चौधरी,गुलाब मराठे,डॉ हेडगेवार नगर ग्रामपंचायत सरपंच सविता सोनवणे, उपसरपंच चंदन पाटील,अँड वसंतराव भोलाणे,सी के पाटील सर,वाल्मीक दादा पाटील,भीमराज पाटील,गोपाल पाटील,दिलीप बापू,रवींद्र कंखरे,रामकृष्ण महाजन,पापा वाघरे, हेमंत चौधरी,दिलीप मराठे,नामदेव मराठे,संजय पवार,अविनाश महाजन,शेखर महाजन सर्व पत्रकार बंधू धरणगाव शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते समाज बांधव भगिनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.