महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन

75

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.10फेब्रुवारी):-म हाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक राज्य अधिवेशन यावेळी राज्यातील नागपुर येथील वसंतराव देशपांडे, स्मृती सभागृह, सिव्हील लाईन, नागपुर येथे दिनांक १७ व १८ फेब्रुवारीला आयोजीत करण्यात आले आहे.

या अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडु असुन प्रमुख उद्घाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपमुख्यमंत्री मानद सचिव महाराष्ट्र राज्य संदिप जोशी, प्र. कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, माजी आमदार महेद्र कपुर, पदवीधर मतदार संघ नागपुर विभाग अनिल सोले, माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार, माजी आमदार भगवान सोळंके, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह राजकुमार बोलकिले यावेळी उपस्थित राहणार असुन १७ व १८ फेब्रुवारीला देशातील शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व जुनी पेन्शन योजना याविषयी उपस्थित मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच या अधिवेशनात यावेळी शिक्षकांच्या असणाऱ्या समस्यांचे तक्रार निवारण व शंकाचे समाधान यावेळी चर्चा करून करण्यात येणार आहे. या चैवार्षिक राज्य अधिवेशनात अनेक शैक्षणिक विषयावर चर्चा होणार असुन या अधिवेशनास शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विलास खोंड, जिल्हा कार्यवाह दिलीप मॅकलवार, जिल्हा संयोजक विवेक आंबेकर, सहसंयोजक वसंत वडस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष मुस्तकिम पठाण, कार्यालय मंत्री विलास वरभे, प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र मोहीतकर यांच्यासह सर्व जिल्हयाचे पदाधिकारी यांनी केल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चिमुर तालुका अध्यक्ष प्रमोद धारणे व कार्यवाह परमानंद बोरकर सह सर्व तालुक्याचे पदाधिकारी यांनी शिक्षकांना राज्य अधिवेशनला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.