परिवर्तनवादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवी डॉ.अजय खडसे यांची निवड

109

🔸17 फ्रेब्रु. ला 22 व्या राज्यस्तरीय म.फुले सत्यशोधक साहित्यसंमेलनाचे जरूड येथे आयोजन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.15फेब्रुवारी):-22 व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवी डॉ.अजय खडसे यांची निवड संमेलनाच्या निवड समितीतील मुख्य संयोजक प्रा. श्रीकृष्ण बनसोड व सर्व सदस्यांनी केली.
डॉ.प्रा.अजय खडसे यांनी “मराठी आदिवासी कवितेची वाड.मयीन मीमांसा ” या विषयावर महाराष्ट्रातील पहिली पीएच.डी.प्राप्त केलेली आहे.

उद्धव पर्व व आरंभ बिंदू हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून ग्रामीण दलित आदिवासी साहित्य विशेषांकाचे संपादक होते .संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए.भाग १ व बी.कॉम भाग १ च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता समाविष्ट झालेल्या आहेत .त्यांच्या आरंभबिंदू या कवितासंग्रहाला मराठी वाङमय मंडळ,बडोदा गुजरातचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

प्रा.डॉ.अजय खडसे यांची सत्यशोधक परिवर्तनवादी
कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आयोजन समितीचे प्राचार्य श्री रा.ना. वानखडे,प्राचार्य सुधीर महाजन, अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,डॉ.रजिया सुलताना, शेतकरी नेते श्री दिलीप भोयर,कै.मैनाबाई बुंदेले राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.उज्ज्वला सुरेश मेहरे,प्रा.डॉ.प्रवीण बनसोड (नेर ),स्वागताध्यक्ष श्री अरुण खेरडे,प्रोफेसर डॉ.संजय खडसे,प्रा.डॉ.रवि चापके यांनी अभिनंदन केले आहे.