विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेतील शिक्षकांची भुमिका महत्वाची – लक्ष्मण जाधव

55

 

पुणे: आपण प्रत्येकाने सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सकारात्मक विचार, नियोजनबद्ध अभ्यासावर भर देताना सातत्य टिकवून ठेवले पाहिजे. करिअरच्या प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवताना शिक्षकांची भुमिका महत्वाची असते.
स्वतःतील क्षमतांना ओळखून त्यानुसार करिअरच्या वाटा निवडणे गरजेचे आहे.”असे मत व्याख्याते लक्ष्मण जाधव यांनी बेलेश्वर विद्यालय पखरूड येथील आयोजित दहावी विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कुलकर्णी, माजी सैनिक विष्णु चव्हाण, वाहतूक नियंत्रक बाळु जायभाय,शिक्षक निलेश बोराडे, सुनील कोरे, यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

लक्ष्मण जाधव म्हणाले,””विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते अतूट असते.आयुष्याला समृद्ध करणारी शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अनमोल ठेवा असतो.
शाळेत मिळालेले नैतिकतेचे धडे आणि मिञांना सहवास हा आयुष्याला आकार देणारा असतो.
संस्कारांची ओतप्रोत शिदोरी या वास्तुमधुन निरंतर मिळत राहते.
समाजात वावरताना स्वकर्तुत्वातून आपल्या शाळेचे नाव उंचावणं हे विद्यार्थ्यांची भूमिका असली पाहिजे अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली.

मुख्याध्यापक बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडवणे ही आमची मुख्य भूमिका आहे. ती योग्य पद्धतीने पार पाडावी लागते.
विविध क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं यश हे आमच्या शिकवणीची पोहच पावती असते.आणि आम्हाला आत्मिक आनंद देणारा क्षण असतो.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आठवणी मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सुनील बुटे, शामराव भोसले, बालाजी मुंढे, लक्ष्मण काळे, शिक्षिका अश्विनी आवारे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रावणी गावडे,श्वेतल चव्हाण या विद्यार्थिनी यांनी केले.आभार सानिका कावळे हिने मानले.