शालिनी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२४ चे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजन रंजन, चौबे, ठाकरे, श्वेता शालिनी, अंकोला पुरस्काराचे मानकरी

56

 

पुणे – शालिनी फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२४ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात रंजन, डेटा सायन्स व कृत्रिम बुद्धिमत्ता विषयातील तज्ञ डॉ. संजीव चौबे महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक जे डी सुपेकर, भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या श्वेता शालिनी, बिग बॉस विजेते शिव ठाकरे क्रिकेटपटू सलील अंकोला, समाजसेवक उमेश शहा , हास्य व्यंगकवी सुनील साहिल,शिवशंकर तिवारी, सुमित सिंग चौहान, अजित सिंग राजपाल, अभिनेता विजय पाटकर, अभिनेत्री पायल घोष, गोल्डमॅन सनी वाघचौरे व संजय (बंटी) गुजर, मुकेश त्यागी, शंतनू भामरे, राजकुमार कनोजिया, एलेना टुटेजा, शिवानी सोनार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते अनिर्बन सरकार यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी २०२४ रोजी रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे सायं. ६ वा. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे शालिनी फाउंडेशनचे संस्थापक आणि आयोजक विशाल गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अंबिका सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक डॉ.शैलेश चौबे, सॅपेरीटो पिझ्झा चे संचालक आनंद केशव , शालिनी फाउंडेशनच्या खजिनदार सृष्टी कुमार आदी उपस्थित होते. यंदा सोहळ्याचे ३रे वर्ष आहे.

उद्योजक व अभिनेता असलेले विशाल गोरे हे गेली १८ वर्षे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवितात. वृक्षारोपण, गरजू लोकांना अन्न, वस्त्र दान करणे, पूर, भूकंप इत्यादी आपत्तींमध्ये लोकांना मदत करण्यासाठी सामाजिक निधी उभारणी साठी कार्यक्रमाचे आयोजन करतात. सामाजिक उपक्रमा बरोबरच तरुणाईला व्यासपीठ देण्यासाठी गायन स्पर्धा, आंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन देखील केले आहे. विशाल गोरे म्हणाले, आता पर्यंत शालिनी फाउंडेशन तर्फे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, एसीपी नीलिमा जाधव, अभिनेता सुनील शेट्टी, सुरेश विश्वकर्मा, प्रवीण तरडे, मानसी नाईक, संजय खापरे, गायक उत्कर्ष शिंदे, आनंद शिंदे, कलात्मक हस्ताक्षरासाठी लक्ष्मण बावनकुळे आदीना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.