रामेश्वर बचाटे पाटील यांच्या सामाजिक कार्याचा पोलीस प्रशासनाकडून गौरव

87

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि 18फेब्रुवारी):-सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन सतत समाज कार्य करण्यासाठी तत्पर राहणारे श्री. रामेश्वर बचाटे पाटील यांचा आज परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी साहेब यांच्याकडून सन्मान करण्यात आला.आजच्या काळात बरेच लोक स्वार्थ,राजकारण या गोष्टीच्या मागे पडत असतात पण याला अपवाद वडगाव स्टे.येथील श्री रामेश्वर बचाटे पाटील आहेत.ते सतत समाज कार्य करण्यासाठी अग्रेसर असतात यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो किंवा कसलेही राजकारण नसते.

अडचणीतील लोकांना मदत कशी करता येईल असा ते नेहमी विचार करतात. तसेच पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याची भावना त्यांची राहिलेली आहे यातूनच जेव्हा गरज आहे तेव्हा ते पोलीस प्रशासनाच्या मदतीला धावून जातात. या सर्व कार्याची दखल घेऊन एक कौतुकाची थाप परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.रवींद्रसिंह परदेशी साहेब यांनी रामेश्वर बचाटे पाटील यांचा सत्कार करून केली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.

गंगाखेड येथे शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीसाठी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.रविंद्र सिंह परदेशी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.यशवंत काळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे साहेब, तसेच पोलीस निरीक्षक श्री.दीपक कुमार वाघमारे साहेब आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रामेश्वर बचाटे पाटील यांचा सन्मान झाल्यामुळे त्यांना आपले समाजकार्य करत राहण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली.