मूळ भाजप व इतर पक्षातून आलेल्या नेत्यांची भाजप असे लवकरच दिसेल?

266

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18फेब्रुवारी):-सध्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्याला वैचारिक भूमिका घ्यावी लागते. ज्यांच्यासाठी पायात भिंगरी बांधून प्रचार केला. असे काही नेते आपला मूळचा राजकीय पक्ष सोडून भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याच्या प्रयत्नाचा शेवट हा प्रेमभंग झालेल्या प्रेमविरा सारखा झाला आहे. आता मूळचे भाजप व इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या असे दोन गट लवकरच होतील ? अशी निष्ठावंत व प्रामाणिक पक्षाचे काम करणाऱ्या भाजपमधील एका गटाला शंका निर्माण झालेली आहे.

कारण, आता भाजप मध्येच व्यक्तीकेंद्री राजकारणातून भाजपचे मूळ नेते सुद्धा दौरे आखत आहे. असा खुला आरोप होऊ लागलेला आहे.

भारतीय जनसंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे केडर हे भारतीय जनता पक्षाचा मूळ ढाचा आहे. ६ एप्रिल१९८० रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी व अयोध्या मधील श्रीराम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती . रूढीवाद , हिंदुत्व, हिंदू राष्ट्रवाद, आर्थिक उदारीकरण, एकात्मिक मानववाद या पाच विचारांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकत आहे. असा काहींनी समज करून घेतलेला आहे पण त्यामध्ये फारसं तथ्य नाही. पूर्वी ते विचार मांडले जात होते. आता असे विचार मांडणे भाजपमध्येच गुन्हा ठरलेला आहे.

खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता १९९८-९९ साली आली होती. पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी यांची वर्णी लागली तेव्हापासून आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्ष नेते व कार्यकर्ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. अलीकडच्या काळामध्ये लोकसभेमध्ये ५४३ पैकी ३०३व राज्यसभेमध्ये २४५ पैकी९३ खासदार हे भाजपचे आहेत. २०१४ पासून केंद्रात भाजपची सत्ता आहे .पण २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत ४८ पैकी २३ खासदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत. युतीच्या काळात ४८ पैकी ४२ खासदार निवडून आले होते.

आता सध्या राजकीय गणित लोकशाहीच्या मानाने सुशिक्षित आलेले असून सर्वच पक्षात पडझड झालेली आहे. याला भविष्यात भाजपही अपवाद ठरणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे .कारण वैचारिक बांधिलकी व वैचारिक बैठक असलेले कार्यकर्ते हे पक्षाचा पाया असतो. आज त्या अर्थाने वैचारिक बैठक असलेले डाव्या व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सोडले तर अनेक कार्यकर्ते हे व्यवसायिक व बाजारू म्हणजे आठवड्याच्या बाजारला ग्राहकांना जे लागते त्या वस्तू घेऊन विक्री करणे व त्यातून नफा मिळवणे. या वृत्तीची आहे.
मूळ भाजप मधील जे कार्यकर्ते आहेत ते हिंदुत्वासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. आज संपूर्ण देशामध्ये नव्हे पण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रस्थापित व घराणेशाहीला पाठिंबा देणाऱ्या अनेक रथी महारथी लोकांच्या हातात भाजप गेलेले आहे. हे सांगण्यासाठी निष्ठावंतांना कमीपणा वाटत नाही. मुळातच मुळ भाजपमधील अनेक चेहरे हे अलीकडच्या राजकारणामध्ये जाणीवपूर्वक दूर ठेवलेले आहेत. आणि व्यक्तीनिष्ठ राजकारणाला आपली निष्ठा वाहणाऱ्या कार्यकर्त्यांची आज चलती आहे. शेवटी चलती का नाम गाडी … बढती का नाम दाढी …..हे समीकरण झाले आहे.

१९८४ साली दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाची वाढ व विस्तार करण्यामागे खूप मोठे योगदान हे काँग्रेस पक्षाचे अनेक नेत्यांचे आहेत. विशेषता काँग्रेसच्या सत्तेमध्ये पंतप्रधान नरसिंहराव यांनी रामानंद सागर यांच्या महाभारत व रामायण या दूरदर्शन मालिकेला मान्यता देऊन दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेला मूक संमती दिली होती. या सर्व गोष्टींचे नोंदणी आजही नोंद पटलावर आहे. मुळातच भारतीय जनता पक्ष धार्मिक व आध्यात्मिक आणि मूलगामी बदल न करता मूळचा साचा म्हणजे पांचाजन्य जे पचन तेवढेच खायचे व जे आवडत नाही त्याला हात लावायचा नाही. ही चांगली व आरोग्यास चांगली साथ देणारे विचार आहेत .

राजकारणामध्ये कोणीही कोणाचा शत्रू अथवा मित्र नसतो. त्यामुळे आपल्या सोयीने राजकारण करून आपण जनतेच्या विकासासाठी पक्ष बदलला असं निर्लज्ज पणाने सांगून आपला स्वार्थी हेतू कुणाला कळू नये. असे मुखवटे धारण करायचे आणि पुन्हा आपला चेहरा हा सुंदर असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी जाहिरात बाजी करायची हे आता सर्वांनाच पत्नी पडलेले आहे. त्यामुळे भविष्यात भाजपमधील मूळचे विचार सांगणारे कार्यकर्ते व इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांची दुबळी लवकरच राजकारणात दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. शेवटी परिवर्तन संसार का नियम आहे. त्याला भारतीय जनता पक्ष अपवाद नाही. हे ठळक दिसू लागलेले आहे.