भारतीय विद्यार्थी मोर्चा विडूळ द्वारे शिवजयंती साजरी

67

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

विडूळ (दि. 19 फेब्रुवारी) बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त तालुक्यातील
विडूळ या गावी मोठ्या उत्साहात प्रबोधन करुन अभिवादन करण्यात आले.

आज संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात देखील शिवजन्मोत्सव साजरा केल्या जातोय.
लोकशाही भारतात एका महान राज्यकर्त्या राजांना वंदन केल्या जात आहे.याचा अर्थ छत्रपती शिवरायांचे स्वराज्य किती महान होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आज अठरापगड जाती धर्मातील बांधवांमध्ये शिवरायांचा खरा इतिहास आणि समतेचा विचार पोहोचला तर या देशात एकही धार्मिक किंवा जतिय वाद विवाद होणार नाही.
असे मत यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा चे विडूळ अध्यक्ष विक्रम धुळे यांनी व्यक्त केले.
आजच्या तरुणांनी शिवरायांचा विचार अनुसरून आपल्या जीवनात मार्गक्रमन केले तर आजचा युवा निराशेच्या गर्तेत,समस्यांच्या विळख्यात अडकणार नाही.कारण शिवविचार हा मरणाऱ्याल सुद्धा स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देतो असे मत उपाध्यक्ष अतुल केंद्रेकर यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ज्याठिकाणी प्रबोधन करण्यात आले.
महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करून आयुष्यात वाटचाल करीत ह्या देशात समता, स्वातंत्र्य,बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज निर्मिती साठी कार्यरत राहूया असा संकल्प यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे अतिश खिल्लारे, तुषार भगत,आशिष धुळे,सचिन वाढवे,अरुण कानींदे, सिद्धार्थ खिल्लारे, रवी धुळे,माधव धुळे, रोमन भगत,यांसह अनेक युवा उपस्थित होते.