✒️रोशन मदनकर(ब्रम्हपुरी,तालुका प्रतिनिधी)

मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.3ऑगस्ट): सकाळी ७.३० वाजता दोघे बाईक सवार ब्रम्हपुरी ला जात असताना अर्हेर- नवरगाव च्या हद्दी मध्ये ब्रम्हपुरी रोडवर जोरदार अपघात झाला.

ब्रम्हपुरी वरून गाडी न.MH29 T 936 हा मिनी ट्रक ब्रह्मपुरीवरून अर्हेर नवरगाव येथील माँ तुळजाभवानी राईस मिल मध्ये तांदूळ सालटेक्स करण्यासाठी येत असताना अर्हेर नवरगाव वरून भरधाव वेगाने येत असलेल्या दुचाकी mh34bj 1376 ने ब्रम्हपुरी वरून येत असलेल्या ट्रक ला धडक दिल्याने उपचारास नेत असतांना दुचाकी स्वाराचा निधन झालं.           अपघातात एक जागीच ठार तर दुसरा बचावला आहे.

मृत्यु पावलेल्या युवकाच नाव सौरभ लालाजी पिल्लारे असून त्याची वय २३ ते २४ वर्षे दरम्यान आहे. हा युवक बाईक चालवत होता. तर मागे बसलेला युवक बचावला त्याचे नाव रंजीत उमेश बुल्ले (२२)आहे.हे दोघेही राहणार भलेश्र्वर पोस्ट. अर्हेर- नवरगाव ता. ब्रम्हपुरी चे रहिवासी आहेत.पुढील तपास पो.नि.बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात कॉन्स्टेबल गौरकर ,कॉन्स्टेबल इंगोले करीत आहेत.

Breaking News, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED