24 व 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन

81

🔸ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध साहित्यिक कार्यक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर मार्फत जिल्हा ग्रंथोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार,दि. 24 व रविवार, दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर येथे जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून त्यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे ग्रंथपूजन व तदनंतर जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहेत. दुपारी 3 वाजता वाङमय व अवांतर वाचनापासून मराठी वाचक का दुरावत आहे? या विषयावर परिसंवाद-1, संध्या. 5 वाजता कथाकथनचे आयोजन.

रविवार,दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, दुपारी 12 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा : एक विहंगावलोकन या विषयावर परिसंवाद-2, दुपारी 3 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन राहील तर सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नरक्षित शेंडे यांनी कळविले आहे.