अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी गजाआड

1313

🔺जयपुर राजस्थान येथून अटक:ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24फेब्रुवारी):-पो. स्टे. ब्रह्मपुरी दाखल अप.क्रमांक 205/2023 sec. 363, 376(2)(n) IPC, R/w 4,6 Pocso अन्वये दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलगी रा. लाडज, तालुका ब्रह्मपुरी. हिला तिचे पालकाचे मर्जीविरुद्ध फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा गुन्हा दाखल होता.

गुन्ह्यात आरोपी नाव जितेश रामबाबू जागा रा. जयपुर (राजस्थान) याचा शोध घेणे असल्याने सदर गुन्ह्यात तपासा दरम्यान तांत्रिक तपास करून आरोपी हा जयपूर राजस्थान येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात ब्रह्मपुरी पथकाची टीम रवाना होऊन राजस्थान जयपुर येथून आरोपी नामे जितेश रामबाबू जागा राहणार श्री रामगोपालपुरा जयपुर राजस्थान. यास जयपूर शहर हद्दीतून अटक करून ब्रह्मपुरी येथे आणले व त्यास मा. जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर येथे हजर केले आले.

यापूर्वी ब्रह्मपुरी पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलगीचा शोध घेऊन तिला तिचे पालकांचे ताब्यात सुखरूप दिले होते.. सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी दिनकर ठोसरे , पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात पो उपनि निशांत जुनोनकर, सोबत पो.हवा. योगेश/1734 ,PC संदेश/2332, PN विजय/163, PN मुकेश/2552,PC प्रमोद/2678, WPC/शिल्पा 531 सर्व पो. स्टे. ब्रम्हपुरी यांच्या पथकाने केली.