गेवराई खरेदी विक्री संघावरअमरसिंह पंडित यांचे वर्चस्व कायम राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी

93

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

गेवराई तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवार, दि.२३ या उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाचे केवळ १७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध पार पडली आहे. खरेदी विक्री संघावर अमरसिंह पंडित यांनी आपल्या गटाचे वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून त्यांना माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शुभेच्छा दिल्या.

गेवराई तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि.१६ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. दि.२३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या एकुण १७ जागांसाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या गटाकडून मतदार संघनिहाय १७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध पार पडली आहे. विरोधकांना या निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संस्था प्रतिनिधी मतदार संघातून औटी जयदीप कल्याणराव, देशमुख सुनिल आसाराम, आरगडे श्रीराम विठ्ठलराव, यमगर देवराव गिरमाजी, पघळ दिनकर आश्रुबा, मावसकर हनुमान राधाकिसन, काळे दिनकर प्रताप, नलावडे सतिष वसंतराव, घोडसे हनुमंत साहेबराव, ढाकणे सखाराम माधव, वैयक्तिक सभासदांमधून साबळे बळीराम अच्युतराव, शेख रफीक अब्दुलगनी महिला प्रतिनिधी म्हणून डरपे मोहन नारायण, कोंढरे विमल रघुनाथ अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून गचांडे सोमेश्वर आत्माराम इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून पांचाळ जनार्धन राजाराम व भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून राठोड गणपत हरिभाऊ हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

गेवराई तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संघाच्या प्रगतीसाठी भविष्यात जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असून नवनिर्वाचित संचालकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. निवडणुक बिनविरोध केल्याबद्दल संघाचे सर्व सभासद, मतदार बंधु भगिनींचे अमरसिंह पंडित यांनी आभार व्यक्त केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्रीमती एस.एस.कदम यांनी काम पाहिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, बाजार समितीचे उपसभापती विकास सानप,जगनपाटील काळे, जगन्नाथ शिंदे, बाबुराव काकडे, माजी सभापती कुमार ढाकणे, पांडुरंग कोळेकर, सुभाष मस्के, श्रीहरी पवार, आवेजसेठ, दत्ता दाभाडे, अनिरुद्र तौर, गहिनीनाथ ढाकणे, फुलचंद बोरकर,नंदकिशोर गोर्डे, शंकर तौर, रोहिदास चव्हाण, अशोक नाईकवाडे, शेख मिनहाज, ताहेर पठाण, इमू पटेल, परमेश्वर खरात, पांडुरंग कोळेकर, राजेंद्र वारंगे, शेख समशेर, अरुण वाघमारे, चंद्रकांत पंडित, हनुमान कोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.