चौसाळा येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविणार-विवेक कुचेकर

43

 

(बीड प्रतिनिधी)प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जंयती निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहीती सार्वजनिक जंयती उत्सव समितीचे आयोजक विवेक कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. दि,१४ एप्रील रोजी छत्रपती शाहुनगर याठिकाणी पंचशिल ध्वाजाचे अन्वारण होणार असुन दि,२५ एप्रील २०२४ रोजी गोरगरीब विदयार्थी शिक्षणासाठी दत्तक घेतले जाणार आहेत तसेच दि,२६ एप्रील रोजी वृध्दआश्रमात फळे वाटप करण्यात येणार आहेत दि,२७ एप्रील रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच ३० एप्रील रोजी छत्रपती शाहु नगर ते भीम नगर भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असल्याची माहीती सार्वजनिक भीम जंयतीचे आयोजक विवेक कुचेकर,प्रदीप चव्हाण,पवन कुचेकर,प्रदीप ईंगोले,मिंलीद सोनवणे,आमोल जावळे,अजय ईंगोले,विकी ढोकणे,स्वपनील सोनवणे,कृष्णा चव्हाण,राज सोनवणे,वैभव सोनवणे,तोफेक पठाण,शंकर सोनवणे,दादा गायकवाड,साहेद पठाण,दत्ता साळवे,बाबु ढोकणे,आदेश बोबडे,बाळु कांबळे,रवि सोनवणे,प्रताप सांळुके,प्रेम तुपारे,कपिल मस्के,साहील सोनवणे,गणेश सोनवणे यांनी दिली आहे.