चित्तशुद्ध राखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम होय ! -धम्मसंगिती

73

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.25फेब्रुवारी):-सर्व शरीर धर्माचा प्रमुख घटक मनच आहे, असे धम्मपदाच्या पहिल्याच गाथेत म्हटले आहे.सर्व कुशल – अकुशल कर्माचा संभव मनातच होतो.त्यामुळे आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करणांना साधकाला आर्य अष्टांगिक मार्गात बाधा निर्माण करतील अशा चित्तप्रवृती निर्माण होऊ न देणे आणि निर्माण झाल्या असतील तर, त्या निरस्त करणे, तसेच कुशल चित्तप्रवृती निर्माण करणे आणि निर्माण झालेल्या कुशल चित्तप्रवृतीत वाढ करणे, म्हणजेच चित्तशुद्ध राखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न म्हणजे सम्यक व्यायाम होय ‘ असे मत धम्मसंगितीत व्यक्त झाले.

माघ पौर्णिमा धम्मसंगितीचे आयोजन दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वा चार्वाकवनात करण्यात आले होते.धम्मसंगितीच्या अध्यक्षपदी से.नि.जिल्हाधिकारी आयु.मनोहरराव भगत होते.

धम्मसंगितीचे सदस्य उपा.गोविंदराव तलवारे यांचे दि.१३ फेब्रुवारी रोजी निधन झाले अशी माहिती देवून आयु. तुकाराम चौरे यांनी धम्मसंगितीत शोक प्रस्ताव मांडला.तो पारीत झाल्यानंतर स्मृतीशेष गोविंदराव तलवारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आयु.तुकाराम चौरे यांनी माघ पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व विशद केल्यावर ‘ सम्यक व्यायाम ‘ या विषयावर चर्चा झाली.सर्व आयुष्यमान नागोराव खंदारे, पी. बी.भगत,डी.जी.पाईकराव,डी.जी.गोस्वामी,मा.ल.धुळध्वज आणि सुधाकरराव बनसोड यांनी चर्चेत भाग घेतला.अध्यक्षीय समारोपानंतर संगितीची सांगता झाली.संगितीत आयु अॕड.अप्पाराव मैन्द,चंद्रकांत आठवले, एस. टी. वैराळे, चंद्रमणी गायकवाड,रणवीर गायकवाड, यशकुमार भरणे,साहेबराव गुर्जर, उमाकांत चक्करवार, व्ही. एस. जोहरे,वामनराव देशमुख, एन. डी. ताटेवार, एन.एन,जाधव,सुधाकर चापके,प्रदीप तायडे आणि विश्वजित भगत उपस्थित होते.