संविधान वाचविण्याची जबाबदारी सामान्य नागरिकांवर – दादासाहेब शेळके (संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना)

96

[राज्यस्तरीय संविधान बचाव परिषद हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न]

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.26फेब्रुवारी):- शहरामधील रेस्ट हाऊस समोर भिम टायगर सेना सामाजिक संघटने तर्फे राज्यस्तरीय संविधान बचाव परिषद आयोजन करण्यात आले होते. तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ. मोहनराव मोरे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भिम टायगर सेना) हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद फुलमाळी, राष्ट्रपाल सावतकर, संतोष चोपडे, सिंघम ढगे, करण भरणे, संतोष जोगदंडे (माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,उमरखेड), सुनील पाटील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना यवतमाळ), संबोधी गायकवाड (सभापती ढाणकी), सिद्धार्थ बरडे (उमरखेड तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले गट), ॲड. पंजाब नवसागरे, गजानन दामोदर, पत्रकार विजय कदम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्कारमूर्ती म्हणून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अझरभाई खान पत्रकार, राजेश ढोले पत्रकार, सतीश कोल्हे पत्रकार, शेख निसार पत्रकार, रमामाता महिला मंडळ, संतोष जोगदंडे, देवानंद पाईकराव (भीम शाहीर), दादासाहेब शेळके, मोहनराव मोरे, संगीताबाई धुळे, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड) कैलास कदम (तालुका अध्यक्ष), संदीप विणकरे शाखाध्यक्ष, प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते) उमरखेड यांचा ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.उद्घाटक प्रा. डॉ. मोहनराव मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भारतीय संविधानाबद्दल सविस्तर माहिती सांगत होते की, भारतीय संविधान वाचवण्याची जबाबदारी आज सामान्य नागरिकांवर येऊन बसली आहे. मनुस्मृतीच्या काळामध्ये उच्चवर्णीय जात सोडून कोणालाच म्हणजे मराठा,एससी एसटी, ओबीसी इतर जातीला बोलण्याचा, शिक्षणाचा, ऐकण्याचा, बघण्याचा अधिकार नव्हता.

पण बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून सामान्य नागरिकांना समता, समानता न्याय, हक्क, आणि मतदानाचा हक्क देऊन जगण्याचा नवा मार्ग दिला आहे.जर हिंदू राष्ट्र झाले तर हे सर्व हक्क नाहीसे होतील आणि पुन्हा मनुस्मृति लागू होईल.. म्हणून आज सामान्य नागरिकांवर भारतीय संविधान वाचविण्याची जबाबदारी आलेली आहे.म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे घनाघाती भाषण शेळके यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

तसेच गायक अजय देहाडे यांनी आपल्या शाहिरीतून प्रबोधनात्मक बुद्धभीम गीते गाऊन सर्वांना मंत्रमुक्त केले….!सूत्रसंचालन भीमशाहीर देवानंद पाईकराव तर आभार प्रदर्शन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी मानले.यावेळी उमरखेड शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.