डाॅक्टर ऑफ लेटर्स !

54

(नानाजी देशमुख स्मृतिदिन विशेष)

नानाजी देशमुख यांचे पूर्ण नाव चंडिकादास अमृतराव देशमुख हे आहे. हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच सन १९९७मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान केलेली आहे. महाराष्ट्रातील नानाजी देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी संजिवणी योजना तयार केलेली आहे. राज्यातील शेतकरी दररोज काही ना काही अडचणी सापडतात. त्यामुळे एक मोठी समस्या त्यांच्यासमोर निर्माण होते. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नसल्यामुळे दुष्काळ आहे आणि त्यामुळे शेतकरी शेती करण्यास असमर्थ आहेत आणि बर्‍याच शेतकर्‍यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. या सर्व अडचणी लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१ सुरू केलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन दुष्काळग्रस्त भागांना दुष्काळ मुक्त करेल जेणेकरून शेतकरी जगू शकतील व आरामात शेती करू शकतील. या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०१९च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि त्यांचे आयुष्य चांगले जगू शकतील. अशी ही छान माहिती कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे गुरुजींच्या शब्दांत नक्की वाचाच…

त्रिकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्या टप्प्याने प्रकल्प हाती घेतला. त्रिकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थाटन केली. तसेच कृषिविज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले. पिकांचे बियाणे कोणते वापरावे यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. मध्यप्रदेशातील विविध भागातील शेतकऱ्यांना येथूनच मार्गदर्शन होत असते. सन १९९९ ते २००५ या कालावधीमध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना सन १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ग्रामीण विकासासाठी योगदान होते. खेडी ताकदवान होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते. चंडिकादास अमृतराव देशमुख उर्फ नानाजी देशमुख यांनी सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून पद प्राप्त केले होते.

त्यानंतर नानाजींनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र चरित्राच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच त्यांनी जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या समवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. त्यानंतर जनता पक्षाच्या माध्यमातून ही राजकारणात सक्रिय झाले. पांचजन्य राष्ट्रधर्म व स्वदेशी या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना: महाराष्ट्र २०१९चे फायदे या योजनेअंतर्गत राज्यातील लघु व मध्यम शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा महाराष्ट्र २०२१ या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

या योजनेच्या दुष्काळा माध्यमातून महाराष्ट्र शासन राज्यातील दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त करेल. यामध्ये शेतकरी शेती करू शकतात. ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात २८ कोटी रुपयांची मदत घेतली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०१९च्या माध्यमातून मातीची गुणवत्ता प्रथम तपासली जाईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुधारणा केली जाईल. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन, तलावाचे शेळीपालन युनिट ऑपरेशन लहान रवंथ करणारा प्रकल्प, वर्मी कंपोस्ट युनिट, सिंचन प्रकल्प, शिंपडा ठिबक सिंचन प्रकल्प, पाण्याचा पंप, फलोत्पादन अंतर्गत वृक्षारोपण प्रकल्प महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०१९ची कागदपत्रे- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा, या योजनेअंतर्गत लघु व मध्यम वर्गीय शेतकरी पात्र ठरतील. आधार कार्ड, पत्ता पुरावा, ओळखपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंमलबजावणी: देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत राज्यातील सर्व सुखी भागात महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहे. या तपासणीनंतर सर्व महत्त्वपूर्ण डेटा गोळा केला जाईल. या सल्ल्यानंतर शेतकऱ्यांना राज्यातील पाणी व हवेनुसार शेती करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लागवड केलेल्या जमिनीच्या मातीचीही चाचणी घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये खनिजांची कमतरता आणि बॅक्टेरियाची कमतरता पूर्ण होईल. शेती करणे शक्य होणार नाही, अशा सर्व क्षेत्रात शेळीपालन युनिट स्थापन केल्या जातील जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत राहू शकेल. तलावांचे उत्खनन व मत्स्यपालनाचे उद्योग उभारले जातील. सिंचनाच्या पाण्याची कमतरता असलेल्या सर्व ठिकाणी ठिबक सिंचन लागू केली जाईल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची साधने शिंपड्यांच्या संचाद्वारेही देण्यात येतील. तर राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी ज्यांना महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१च्या अंतर्गत अर्ज करायचा असेल तर ते शेतकरी बांधव अर्ज करू शकतात.

जन्म: नानाजी देशमुख यांचा जन्म दि.११ ऑक्टोबर १९१६ महाराष्ट्रामधील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या छोट्याच्या गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावात जन्म झालेले नानाजी हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. ते लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी हे संघसंस्था संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी आश्वासन विकास साधण्याचे सामाजिक कार्य करण्याचे ठरवले.
शिक्षण: नानाजी यांचे शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झाले. संघाचे स्वयंसेवक झाल्यानंतर नानाजी देशमुख यांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे प्रचारक म्हणून पाठविण्यात आले.

भारतीय जनता संघात सक्रिय झाल्यानंतर ते उत्तर प्रदेशात चौधरी चरण सिंग यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यामध्ये नानाजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. आणीबाणी संपल्यावर नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपुर मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेत गेले होते. देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील समाजकार्य केल्यानंतर शेवटी उत्तरप्रदेशात त्रिकूटे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी त्रिकूट ग्रामोदय विद्यालयाची स्थापना केली. भारतातले पहिले ग्रामीण विद्यापीठ म्हणून ते ओळखले गेले. याचा फायदा मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना होतो.

सामाजिक कार्य: दीनदयाल शोध संस्थांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. चाळीस हजार कूपनलिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. पाणी आडवा, पाणी जिरवा या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ केली. त्रिकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. आरोग्यधाम व गोशाळा, उद्यमिता, विद्यापीठ, ग्रामोद्योग, विद्यालय, आश्रम शाळा, गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंत चिकित्सा केंद्र तरी त्यांनी त्रिकूटमध्ये उभारलेत. सन १९९० दरम्यान मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातील एक प्रत्येकी अडिचशे गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास केला.

राजकीय कारकीर्द व पुरस्कार: नानाजी देशमुख यांनी आणीबाणीच्या नंतरच्या काळात सन १९७७मध्ये काही काळ लोकसभेचे सदस्य तर सन १९९९मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली होती. भारत सरकारने त्यांना सन १९९९ साली त्यांच्या कार्याचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. तर सन १९९७मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान केली. तसेच त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

मृत्यू: नानाजी देशमुख यांचा मृत्यू दि.२७ फेब्रुवारी २०१०मध्ये झाला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने गौरव केला आहे. नानाजी देशमुखांना प्रणव मुखर्जी सोबत भारतरत्न दिल्याबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. या दोघांची तुलना होऊ शकत नाही, असं वक्तव्य रत्नाकर महाजन यांनी केलेला आहे. तशीच टीका आम आदमी पार्टीने देखील केलेली आहे, हे विशेष!

!! स्मृतिदिनी नानाजी देशमुखजींना विनम्र अभिवादन !!

✒️कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे गुरुजी.पोटेगावरोड, गडचिरोली, जि. गडचिरोली.मधुभाष- ७७७५०४१०८६