सेवानिवृत्त तहसीलदार के. डी. मेश्राम यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

1341

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1मार्च):-आयुष्याची बरीच वर्ष प्रशासकीय सेवेत, तहसीलदार म्हुणुन सेवा दिल्या नंत्तर सेवानिवृत्त्तीपर के. डी. मेश्राम यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केले.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार प्रशासकीय यंत्रनाना घेऊन, दडपशाहिचे राजकारण करीत आहे, हे लोकशाही विरुद्ध कृत्य असून लोकशाही संपुष्ठात आणण्याचा भाजपाचा डाव असल्याने, लोकशाही मूल्यांच्या रक्षणाकरिता  काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे के. डी. मेश्राम यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. पेंटारामजी तलांडी,  प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार, जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, काँग्रेस नेते हसनभाई गिलानी, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, सगुणताई तलांडी, LDM प्रमुख लताताई पेदापल्ली, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंतू मडावी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, बंगाली सेल अध्यक्ष बिजन सरदार, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रमेश कोडापे, मिलिंद खोब्रागडे, सह इतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते