शरदचंद्रजी पवारांच्या पाठिशी ,बीडची जनता काल पण होती, आज पण आहे आणी भविष्यातही राहील – विवेक कुचेकर

70

✒️नवनाथ आडे(बीड, जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.1मार्च):-शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे राजकीय पटलावरील ध्रुवतारा आहेत, पवार साहेब म्हणजे आयुष्यातील हजारो संकटांना तोंड देत महाराष्ट्रातील राजकीय पितामह शरदचंद्रजी पवार साहेब आहेत असे प्रतिपादन बालाघाटावरील चौसाळा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केले आहे.सध्याचे वर्तमान सरकार साम दाम दंड भेदाची निती वापरुन जरी महाराष्ट्रातील राजकारण बिघडवण्याचे काम करत आहे.

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाने महाराष्ट्रात आपल्या विचारांची मुहुर्तमेढ रोवली होती, वाडी वस्ती पासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या विधानभवनावर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवला होता त्याच शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत करण्याचे महापाप सध्या सुरू आहे. परंतु शरदचंद्रजी पवारांना नेस्तनाबूत करण्याचे गोड स्वप्न पाहणार्या लोकांनी हे लक्षात ठेवावे कि, शरदचंद्रजी पवारांच्या विचारावर आणी शब्दावर महाराष्ट्रातील जनता प्रेम करते. बीड जिल्ह्या हा शरदचंद्रजी पवार साहेबांचा बालेकिल्ला असणारा जिल्हा आहे.

बीड जिल्ह्यावर शरदचंद्रजी पवार साहेबांचे विशेष असे प्रेम पहिल्या पासुनच आहे, बीड विधानसभेचे लोकप्रिय आमदार संदीप (भैय्या) क्षीरसागर हे शरदचंद्रजी पवार साहेबांचे लाडके आमदार म्हणुन ओळखले जातात कारण संदीप (भैय्या )क्षीरसागर या तरुण आमदाराने बीड विधानसभेत लोककल्याणकारी अनेक उपक्रम राबवुन या मतदार संघातील तळागळातील नागरिकांपर्यंत पवार साहेबांची राष्ट्रवादी पोहचवली आहे.

आमदार संदीप भैय्या क्षीरसागरांच्या जोडीला डाँ.बाबुरावजी जोगदंड यांच्या सारखे खंदे आणी वैचारिक साथीदार असल्यामुळे कुणी कितीही साम दाम दंड भेदाची निती वापरु द्या किंवा शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष व चिन्ह कुटनीतीने मिळवु द्या, पण बीडची जनता शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी काल पण होती, आजपण आहे, आणी भविष्यात सुध्दा राहणार आहे.

साहेबांच्या हातुन घडयाळ हे चिन्ह जरी गेले असले तरीही आता शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. याच तुतारीच्या आवाजाने आगामी काळात महाराष्ट्रातील जनता मुंबई विधानसभेचे तख्त पालटवुन पुन्हा त्या तख्तावर देशाचे जाणते नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातीच धुरा देणार आहेत. आज जरी कपटनीतीचे राजकारण करुन विरोधक पवार सांहेबांना संपवु असा मणसुबा आखत असतील तरी महाराष्ट्राच्या राजकारण शरदचंद्रजी पवार ना कधी हरले ना कधी हरतील असे