करूणा मुंडे यांच्यावरील ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

258

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2मार्च):-करुणा अशोक शर्मा उर्फ करूणा धनंजय मुंडे यांनी दिनांक 5 सप्टेबर 2021 रोजी परळी शहरांमध्ये येऊन नामदार धनंजय मुंडे यांच्या बद्दल पत्रकार परिषद घेणार असल्याची फेसबुक लाईव्ह वरून सांगितले होते त्यानुसार करुणा शर्मा उर्फ मुंडे या 5 सप्टेबर या दिवशी परळी वैजनाथ येथील मंदिरामध्ये आल्या होत्या त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांनी त्यांना व इतरांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच करुणा शर्मा उर्फ मुंडे यांनी धनंजन मुंडे व त्यांची पत्नी यांना देखील शिवीगाळ केली.

त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांचा जाब विचारला असता सौ करूणा शर्मा उर्फ मुंडे त्यांच्याबरोबर असलेला दुसरा आरोपी अरुण दत्तात्रय मोरे यांनी फिर्यादी व इतरांना धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ व जीवे ठार मारण्याचा बाबतचा गुन्हा परळी शहर पोलीस स्टेशन जिल्हा बीड येथे त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता व सदरच्या गुन्ह्यामध्ये सौ करुणा अशोक शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे आणि अरुण दत्तात्रय मोरे यांच्या विरुद्ध प्रथम खबर क्रमांक 142/2021 दाखल करण्यात आला होता व त्या गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपीना त्यादिवशी अटक करण्यात आली होती.

त्यानंतर दोन्ही आरोपी हे जामीनावर सुटलेले होते सदरच्या प्रकरणामध्ये विभागीय पोलीस अधिकारी यांनी केसचा तपास करून दोषारोप पत्र माननिय विशेष तथा अप्पर सत्र न्यायालय आंबेजोगाई या ठिकाणी दाखल केले त्यानंतर करुणा शर्मा उर्फ मुंडे यांनी सदरचे एफ आय आर दोषारोप पत्र रद्द करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी फौजदारी अर्ज दाखल केला सदरच्या केस मध्ये प्रतिवादींना बजावल्यानंतर सदरच्या प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादी या वकिलामार्फत हजर झाल्या सदरच्या प्रकरणांमध्ये सर्व कागदपत्र माननीय न्यायालयासमोर आल्यानंतर सदरच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी माननीय नामदार न्यायमूर्ती मंगेश एस पाटील व माननीय नामदार न्यायमूर्ती शैलेश पी ब्रहो यांच्या खंडपीठाला समोर दिनांक 15 /2/2024 रोजी घेण्यात आली.

सदरच्या सुनावणीमध्ये करुणा शर्मा उर्फ मुंढे यांच्या तर्फे एडवोकेट संदीप आंधळे व कल्याण खोले पाटील यांनी युक्तिवाद करताना माननीय न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की सदरच्या प्रकरणांमध्ये आरोपी करुणा अशोक शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे या पहिल्याच वेळी परळी या ठिकाणी गेल्या होत्या व फिर्यादी स्वतः सांगतात की आरोपी करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांना त्या ओळखत नाहीत जर फिर्यादी हे आरोपीला ओळखत नाहीत आणि आरोपीही फिर्यादीला ओळखत नाही त्यावेळी फिर्यादी यांची जात आणि धर्म आरोपीला माहीत असलेला कोणताही पुरावा दोषारोप पत्राबरोबर नाही याबरोबरच आरोपी यांच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा हा राजकीय दोषाने प्रेरित असून कोण्या एका मंत्राच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी आरोपी करुणा शर्मा उर्फ मुंडे यांच्या विरुद्ध कट कारस्थान रुचून दाखल केलेला दिसून येत आहे.

याचबरोबर दुसरा जो आरोपी आहे तोही हे प्रकरण दाखल झाल्यानंतर काही दिवसातच महेश झाला त्यामुळे आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेला आयपीसी कलम 307 चा गुन्हा सिद्ध होत नाही तसेच याबरोबरच महत्त्वाचे असलेले त्या वेळेचे साक्षीदार यांचाही जबाब नोंदवलेला नाही आणि माननीय न्यायालयाच्या असेही निदर्शनास आणून दिले की गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली व त्यादिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग आंबेजोगाई यांनी आरोपी सौ करुणा शर्मा उर्फ मुंढे यांच्या शांताक्रुज वेस्ट मुंबई या ठिकाणी असल्याच्या प्लॉटची घरझडती बाबत ही वरिष्ठांना व संबंधित पोलीस स्टेशनला पत्र यावर केला होता व त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आरोपी करुणा शर्मा उर्फ मुंडे हे वापरत असलेले लॅपटॉप व इतर साहित्य हे जप्त करण्यात आले.

याबाबत माननीय न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की सदरचा गुन्हा हा परळी वैजनाथ या ठिकाणी झाला व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मुंबई येथील घर झडती घेऊन करुणा शर्मा उर्फ मुंडे यांचे महत्त्वाचे असलेले कागदपत्र व लॅपटॉप व हार्ड डिस्क डाटा हा जप्त केला तसेच असाही युक्तिवाद करण्यात आला की जर गुन्हा परळी या ठिकाणी होत असेल आणि आरोपीच्या मुंबई या ठिकाणी जाऊन घर झडती घेऊन तेथील असलेले लॅपटॉप मोबाईल हँडसेट पेन ड्राइव्ह व इतर साहित्य जप्त करण्याचा कोणतेही कारण नाही तरीही उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सर्व खोटा तपास केला आहे.

त्यामुळे आरोपी यांचा कोणताही संबंध नसताना खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून खोटा तपास करून व आरोपी वृद्ध खोटे दोषारोप दाखल केला आहे व त्यामुळे आरोपी विरुद्ध दाखल असलेला एफ आय आर दोषारूक पत्र आणि असलेली स्पेशल रद्द करावी अशी विनंती मान्य न्यायालयासमोर केली यावेळी सरकारी वकील व फिर्यादी यांचे वकिलामार्फत सदरचा गुन्हा रद्द करू नका व दोषारोप पत्र दाखल झालेले आहे.

त्यामुळे हा गुन्हा रद्द करू नका म्हणून विनंती करण्यात आली परंतु सदरचे प्रकरण हे अंतिम निर्णयासाठी राखून ठेवण्यात आले व सदर प्रकरणाचा निकाल हा एक मार्च 2024 रोजी खुल्या न्यायालयीन कक्षामध्ये सांगण्यात आला व त्यावेळी माननीय न्यायमूर्ती साहेबांनी आरोपी सोबत धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांनी दाखल केलेले फौजदारी अर्ज मंजूर करून त्यांच्याविरुद्ध दाखल असलेला एफ आय आर जो क्षारोपपत्र व स्पेशल केशी रद्द केलेले आहे सदरच्या केस मध्ये करूना अशोक शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांच्यातर्फे एडवोकेट संदीप आंधळे यांनी युक्तिवाद केला तसेच या प्रकरणांमध्ये त्यांना एडवोकेट कल्याण खोले पाटील व एडवोकेट बिहार साबळे यांनी सहकार्य केले