गौतम नगरातील पी.टी.आर.च्या प्रश्नाला वाचा फोडणार: माजी आमदार सिताराम घनदाट मामा

132

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी

गंगाखेड((दि.2मार्च:- Library शहरातील गौतम मधील जनता गोर गरिबांना झोपडपट्टीमध्ये मी आमदार असताना या परिसरातील नागरिकांना मीच राहण्यासाठी जागा दिली आहे. मी माझ्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत कधीही गोरगरीब लोकांना कधीही त्रास दिला नाही. त्यामुळे पी टी आर च्या प्रश्नाला मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवणार असे मनोगत दोन मार्च रोजी तहसील कार्यालया समोरील अमरण उपोषण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

गंगाखेड शहरातील गौतम नगरच्या नागरिकांच्या वतीने गेले सहा दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या नागरिकांच्या पी टी आर च्या मागण्या बाबत गंगाखेड शहरातील तहसील कार्यालय व नगर पालिका लक्ष देत नाही.

तसे पाहता गौतम नगर परिसरातील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने नळ, लाईट, स्वच्छालय सारख्या सुविधा देत असताना पी. टी.आर.देण्याची कार्यवाही का होत नाही ? हा प्रश्न असल्यामुळे गौतम नगरातील मूलभूत प्रश्न लक्षात घेता पी टी आर चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांनी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी जनशक्ती कृती समितीचे प्रमुख प्रमोद मस्के यांनी पी टी आर मागण्यांचे निवेदन देत माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांचे आभार व्यक्त केले.