गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनमध्ये आठ वर्षीय मुलीवर अत्याचार

169

🔺चकलांबा पोलिसांनी आवळल्या एका आरोपीच्या मुसक्या

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.3मार्च):-राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनमध्ये एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यात असलेल्या राक्षसभुवन येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपी गावातीलच मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कृत्यात दोन तरुण सहभागी होते. हे दोन्ही आरोपी गावातीलच निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी ही घरात एकटीच होती. याचाचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. इतकेच नाही तर या कृत्यानतंर आरोपींनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकला असल्याचं बोललं जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि डीपीआय लॉयर फोरचे प्रदेश अध्यक्ष अॅड. सोमेश्वर कारके यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाबाबत स्थानिक पोलिसांना कळवले. यानंतर पोलीस ठाण्यात विलास हरिचंद्र पठ्ठे व गजानन तुकाराम राऊत दोन्ही (रा. राक्षसभुवन) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पळ काढला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेवून एका मुख्य आरोपीला अटक केली असून, एक आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे.