आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते ८७० बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप

58

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5मार्च):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ वतीने व गंगाखेडचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून ८७० बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात झाले.

भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे बांधकाम कामगार जीव मुठीत ठेऊन काम करतात. अशा कामगारांना संसार उपयोगी साहित्य मिळाले पाहिजे, या भावनेतून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळांनी ही योजना हाती घेतली आहे. त्या योजनेनुसार गंगाखेड तालुक्यातील ७८० कामगारांना गृहपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले.

भविष्यातही असे नवनवीन उपक्रम राबविले जाऊन बांधकाम कामगारांना यातून कशी मदत करता येईल याकडे मी विशेष लक्ष देत आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार असून येथील जनतेचे सुख दुःख माझे सुख दुःख आहे. या जनतेने मला कारागृहातून निवडून दिले आहे. यामुळे मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नसल्याचे मत आ.गुट्टे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे.

गंगाखेड शहरातील लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे अन्नछत्रालय येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बांधकाम कामगारांनी आ.गुट्टे यांचा सत्कार केला. या प्रसंगी बांधकाम कामगारांची उपस्थिती लक्षणीय होती.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री जिवराज दापकर साहेब, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री साहेबराव भोसले, तालुका प्रभारी श्री हनुमंत मुंडे, नायब तहसिलदार श्री सुनील कांबळे, संचालक श्री माणिकराव आळसे, माजी उपनगराध्यक्ष श्री राधाकिशन शिंदे, श्री उध्दव शिंदे, श्री अरुण सानप, सरपंच श्री गोविंद सानप, श्री सचिन नाव्हेकर, श्री संतोष पेकम, पत्रकार तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री पिराजी कांबळे, पत्रकार श्री रमेश कातकडे, पत्रकार श्री गुणवंत कांबळे, पत्रकार बाळासाहेब जंगले यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. पांडुरंग काळे यांनी केले तर प्रास्ताविक अभिजित चक्के यांनी केले.