संवाद गोलमेज परिषद 10 मार्चला

153

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6मार्च):-आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने समतावादी निवडक स्त्री-पुरुषांची संवाद गोलमेज परिषद जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दि. 10 मार्च रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल दिली.
या संवाद गोलमेज परिषदेस महाराष्ट्रातून पन्नासहुन अधिक विविध सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणारे निवडक स्त्री-पुरुष एकत्र येऊन स्त्री-पुरुष समतेवर चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये प्रथमच निवडक समतावादी स्त्री-पुरुषांची संवाद गोलमेज परिषद होणार असून या परिषदेमध्ये विजया कांबळे, प्रा. टी. के. सरगर, डॉ. अर्चना जगतकर, सीमा पाटील, डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली पवार, कृष्णात स्वाती, निलोफर मुजावर, डॉ. अनिल कवठेकर, किशोर खोबरे, राजेंद्र नाईक, मोहन मिणचेकर, डॉ. सुजाता नामे, राहुल वराळे, रेश्मा खाडे, स्नेहल माळी, विजय कुशान, हेमलता मिणचेकर, स्वाती कृष्णात, जयश्री नलवडे, मंगल समुद्रे, अ‍ॅड, तमन्ना मुल्ला, सुनील भोसले, विमल पोखर्णीकर, उदय कांबळे, शक्ती कश्यप, क्रांती कांबळे, प्रभाकर आडूरकर, सुबोधिनी चव्हाण, लता कश्यप, वनिता भोरे, अक्षता कांबळे, अनिता महाबोधी, शंकर पुजारी, मालती कांबळे, निकिता चांडक, नीती उराडे, वृषाली कवठेकर, लता पुजारी, लक्ष्मी कांबळे, शकुंतला सावंत, पद्मा कांबळे, अनिता गायकवाड, पुनम मेधावी, नितेश उराडे, सुहास लाटवडेकर, अमोल माने, नितीन नेजकर, विनोद शिंगे, अरहंत मिणचेकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

सदर परिषदेस कोल्हापूर मधील समतावादी स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. निकिता चांडक व निती उराडे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला विमल पोखर्णीकर, अनिता गायकवाड, लता पुजारी उपस्थित होते.