नवेगाव हुंडेश्वरी शाळेत फॅन्सीड्रेस स्पर्धा, आईं महिलांचा सत्कार.

131

नागभीड प्रतिनिधी:-(संजय बागडे 9689865954)
जि. प.उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी येथे जागतिक महिला दिन ८ मार्च निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ६९ विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन केले. यात चौदा विद्यार्थ्यांना पारितोषिक सन्मानपत्र देण्यात आले.
छोट्याश्या गावात शासकीय नोकरीत लागलेल्या सात व्यक्तिमत्त्वांच्या आईचा सन्मान करण्यात आला. खरेतर लेकरांना नोकरीवर लावताना तिची झालेली आभाळ, तिने सोसलेले भोगलेले जीवन याची दखल घेत निमित्ताने अशिक्षित मातेचाही होणारा सत्कार बघून सर्व ग्राम महिला भारावून गेल्या होत्या. यात प्रतिभाताई गुरनुले, सरस्वता जांभुळे, प्रेमिलाबाई गुरनुले
सत्यभामा नंदपूरकर, रमाबाई सोनुले, सुनंदा भरणे
सुंदराबाई गुरनुले यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संजय येरणे सर यांनी, सूत्रसंचालन करिष्मा चौधरी, रेश्मीता गुरनुले यांच्या सहकार्यातून सुंदर कार्यक्रम घडून आला. अध्यक्षस्थान सौ. जयश्रीताई उईके शा. व्य. समिती तथा उद्घाटक कल्लूताई नेवारे सरपंच हे होते. तर गावातील प्रथम महिला पोलीस आरती गुरनुले प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन केले. त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रसंगी बेबीताई उईके, तुळशीफुला गुरनुले, सरिता मोहुर्ले, सत्यभामाताई नंदपुरकर,
वर्षाताई गेडाम अर्चनाताईं नान्हे, वासनिक सर, मातापालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.