संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या बॉल बॅडमिंटन चमू मध्ये फुलसिंग नाईक महाविद्यालयाची खेळाडु प्राजक्ता विरेश पेंढारकर ची निवड

165

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद : संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठाच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 21 ते 24 मार्च 2024 मध्ये चेन्नई विद्यापीठ (तामिळनाडू) येथे होणार आहेत, त्यामध्ये फूलसिंग नाईक महाविद्यालयाची खेळाडू प्राजक्ता विरेश पेंढारकर हिची निवड झाली आहे.

तिच्या या यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयभाऊ नाईक यांनी अभिनंदन केले तसेच प्राचार्य डॉ. बी. बी.पाढेण, उपप्राचार्य डॉ.एस. आर. भोयर, प्रबंधक उमेश चव्हाण, क्रीडा संचालक डॉ. संदीप गडदणे क्रीडा समिती सदस्य प्रा निखिल बोरकर, प्रा.धम्मपाल तायडे, प्रा. डॉ. भूषण मनगटे, प्रा.अमोल सपकाळ, प्रा.सुनील खाडे,विजय चंदन, तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.