निवडणुकीच्या धामधुमीत सापडलेले पाकीट परत करून कर्तव्य पार पडले

271

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ :- (दि. 27 एप्रिल) जिल्ह्यात काल यवतमाळ-वाशीम लोकसभेची निवडणूक प्रक्रिये साठी मतदान घेण्यात आले होते.

असंख्य जनतेनी मतदानाचा अधिकार मतदान करून दिला ही मतदान प्रक्रिया सुरू असताना दर्डा नगर मधील एका मतदान केंद्रावर सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांना पैशाने व महत्वाच्या कागदपत्राने भरलेले खिशात ठेवायचे पाकीट सापडले.

विनोद दोंदल यांनी हे पाकीट आपल्या कडे ठेवून पकीटच्या मालकाचा शोध देण्यास सुरुवात केली अशातच पाकीटच्या आतमध्ये असलेल्या महत्वाच्या कागदपत्रां वरून त्यांचा शोध लागला ते गृहस्थ आपल्याच परिचयातील प्रकाश दीघडे सर निघाले. विनोद दोंदल यांनी प्रकाश दीघडे सर यांना फोन करून आपले पाकीट सापडले आहे.

अशी माहिती दिली व त्यांना सापडलेले पाकीट विनोद दोंदल यांनी प्रकाश दीघडे सर यांना पाकीट, पाकिटमधील पैसे, व महत्वाचे कागदपत्रे परत केले, आपली हरवलेले पाकीट, पैसे व कागदपत्रे मिळाल्याने प्रकाश दीघडे सर यांना खूपच आनंद झाला हे त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावा वरून दिसून येत होते.

एकीकडे पाचशे रुपयात मत विकणारे व एकीकडे भरमसाठ सापडलेले पैसे परत केले यामुळे विनोद दोंदल यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.