नवरदेवाने लग्न मंडपात जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य बजावले..!

153

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ:- (दि. 27 एप्रिल) यवतमाळ -वाशीम लोकसभेच्या निवडणुकी साठी यवतमाळ शहरातील उज्वल नगर येथील अजय देऊळकर हया नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याने मतदान केंद्र क्रमांक 102 वर जाऊन मतदानाचं कर्तव्य बजावले.

लग्न मंडपात जाण्यापूर्वी लग्नाच्या वरातीसाठी घोडयावर बसण्यापूवी तो नवरदेव मतदान केंद्रावर पोहचला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला. लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा प्रसंग पण त्याहून
महत्वाचं असतं ते आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य हे तरुणाने सिद्ध केलं.

मतदानाचा दिवशी लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार नाही. याची काळजी प्रत्येक मतदानाने घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा.
असे निवडणूक विभागाने केले.

या आवाहनाला साद देत यवतमाळ- वाशीम लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ शहरातील एका तरुण मतदाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अंगात लग्नाचा कोट, डोक्यावर पगडी अशा वेशभूषेत तो चक्क मतदान केंद्रावर पोहचला.
यावेळी सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या होत्या.

नवरदेव मतदानासाठी आल्याचे पाहून मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसह नागरिकांनीच स्वागत केले.

चतुर्भुज होण्यापूर्वी अजय देऊळकर या नवरदेव बनलेला तरुणाने प्रथम आपले मतदानाचे कर्तव्य बजावले यावेळी नवरदेवा सोबत बहीण, जवाई, भाचे, सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल, वऱ्हाडी मंडळी व नागरिक उपस्थित होते.