गावंडे महाविद्यालयाचे रा. से. यो. शिबीरार्थ्यांनी बांधला बांधारा व टेकडी मंदिर परिसर केला स्वच्छ

65

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि.१० मार्च)
गोपिकाबाई सीताराम गावंडे वरिष्ठ महाविद्यालय उमरखेड येथील राष्ट्रीय सेवा योजना निवासी विशेष शिबीर दत्त ग्राम नागेशवाडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे दि. ७ मार्च ते १३ मार्च २०२४ या दरम्यान सात दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरा दरम्यान विविध कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भरारीने भाग घेतला.
शनिवार दिनांक ९ मार्च रोजी शिबिरार्थ्यांनी महाशिवरात्री निमित्त झालेल्या भंडाऱ्यात सहभाग घेतला व टेकडी मंदिर परिसर स्वच्छ केले त्यासोबतच गावकऱ्यांना वाढण्याचे काम केले.
त्यानंतर १० तारखेला शिबीरार्थ्यांनी गावातील मोठ्या नाल्यावर बांधारा बांधला व टेकडी मंदिर परिसर स्वच्छता केले व वनभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

या सर्व कार्याच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. प्रशांत आनासाने, महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.अर्चना मिटके, श्री बंटी रुढे, पी. एस. भरती व सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे गावंडे महाविद्यालयातील स्वयंसेवक यांचे हातभार लागले विशेषता नीकेश वानोले, पल्लवी जाधव, लावण्या अनासाने, अभिषेक माने, धनंजय कदम, अजय काळे, सुनील कदम, सुरज डाखरे व अमित केंद्रेकर या सर्व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.