बामसेफ ही राजकीय संघटना नाही – एम डी चंदनशिवे

155

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.11march):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रसार माध्यमांकडून बामसेफच्या राजकिय पक्षांना पाठिंब्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले असून बामसेफ हे सरकारी कर्मचाऱ्यांचे सामाजिक संघठन असल्याने कुणाला पाठिंबा अथवा विरोधाचा प्रश्नच येत नसल्याचे बामसेफ चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एम डी चंदनशिवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, बामसेफ ( BAMCEF) हे मुख्यत्वे सरकारी कर्मचाऱ्यांचे सामाजिक संघठन असून सक्रिय राजनीतीपासून पूर्णतः अलिप्त आहे. संघटनेची मूळ कार्यपद्धतीच Non-Political,Non- Religious,Non-Agitational अशी आहे.
सीबीएसई च्या इयत्ता १० वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात , ‘बामसेफ हे सरकारी कर्मचाऱ्यांचे सामाजिक संघठन जातिभेदाविरोधात जागरूकता तसेच सामाजिक विषमतेविरोधात प्रबोधन करण्याचे कार्य करते. समस्त भारतीय समाजात सामाजिक न्याय आणि सामाजिक समतेसाठी कार्यरत संघटना’ म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यामुळे बामसेफचा कोणा राजकीय पक्षाला समर्थन अथवा विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही बाब तमाम प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे हो यांनी विचारात घेता वृत देण्याबाबत विनंती आहे.

सोबतच महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी बामसेफ आणि राजकिय भूमिका याबाबत येणाऱ्या कोणत्याही वृत्त, अफवा बाबत सावध राहून संघटनेच्या सामाजिक कार्याला आजपर्यंत मनापासून सर्व प्रकारचे सहकार्य केले त्याच पद्धतीने सहकार्य करीत राहून भारतीय संविधानिक मूल्यांवर आधारित राष्ट्र निर्माण प्रक्रियेला हातभार लावणेबाबत आवाहन केले आहे.