वडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी नानासोा कोकरे यांची बिनविरोध निवड

92

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13मार्च):-वडगांव ( ता.माण ) ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन होऊन या ग्राम पंचायतीत प्रा.घनंजय ओंबासे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील ग्रामविकास आघाडीचे नानासाहेब विठ्ठल कोकरे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.म्हसवड माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे गटाचे या ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच अजिनाथ जाधव यांचेवर ता.25 सप्टेंबर 2023 रोजी अविस्वास ठराव आठ विरुध्द एक या सदस्य संख्याबलालात संमत झाल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची आज निवडणुक घेण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी श्री.दडस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निवडणुक प्रक्रियेत सरपंच पदासाठी नानासो विठ्ठल कोकरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे आज दुपारी दोन वाजता श्री कोकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली. या निवडणुक प्रक्रियेत माणचे आमदार जयकुमार गोरे गटाने या ग्रामपंचायती मधील श्री धनंजय ओंबासे यांच्या नेतृत्वाखालील गटास श बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे हि निवडणुक बिनविरोध पार पडली.

यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सीमा नागरगोजे, अजिनाथ गोरख जाधव,उषा शिवाजी इंगळे,किरण दिनकर आवटे आदी उपस्थित होते.नानासो कोकरे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहिर होताच श्री धनंजय ओंबासे,अजिनाथ जाधव,डॉ.प्रसाद ओंबासे,विजय ओंबासे,देवा ओंबासे,सुनिल नागरगोजे,किरण ओंबासे,संजय ओंबासे,माऊली ओंबासे,शिवाजी इंगळे,यशवंत कोकरे,शरद दडस, सोमनाथ दडस,अविनाश नागरगोजे,किरण ओंबासे,नितीन ओंबासे,लखन ओंबासे,दुराज आवटे,जगदिश नागरगोजे आदीनी नवनिर्वाचित सरपंच नानासो कोकरे यांचे अभिनंदन केले.