वाईमध्ये राष्ट्रवादी घरभेद्यांना रोखण्यासाठी चक्क पाटलांनीच फुंकली तुतारी…

219

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : सध्या राजकारणामध्ये निष्ठेला फार महत्त्व राहिलेले नाही. आपल्या स्वार्थासाठी विचारवंतांच्या व युग पुरुषांच्या विचाराची होळी करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यास ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. दक्षिण काशी समजणाऱ्या वाई येथून राष्ट्रवादीने घर भेदांच्या विरोधात चक्क पाटलांनीच तुतारी फुकल्यामुळे फुटीर गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
वाई वाई येथील साठे मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला वाई- खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष दिलीप बाबर यांनी स्वागत केले . या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेले नेते घडले. त्यामध्ये स्वर्गीय किसन वीर आबा लक्ष्मणराव पाटील व प्रतापराव भोसले, मदनराव पिसाळ आप्पा, नारायण पवार, सर्जेराव जाधव, गजानन बाबर या नेत्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. परंतु, आता त्यांचे काही वंशज हे वेगळ्या विचाराचे पाईक झालेले आहेत. त्यामध्ये राजकारण व अर्थकारण आलेलेच असेल तर आता वाईच्या कृष्णा नदीच्या पुला खालून बरच पाणी वाहू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीपेक्षा पक्षातील घरभेद्यांना रोखण्यासाठी सज्ज झालेले आहे. हे वायू विधानसभा मतदारसंघात स्पष्टपणे जाणवले.काल वाई मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवा नेते सारंग पाटील, ॲड विजयसिंह पिसाळ, प्रसाद सुर्वे, निलेश ढेरे, केदार गायकवाड, रमेश पिसाळ, डॉ. सतीश बाबर, संतोष शिंदे, सुधाकर गायकवाड, रवींद्र इथापे, अंकुश मालुसरे सतीश बाबर, समाधान कदम, शैलजा खरात ,मालन चव्हाण, मोहिनी पिसाळ यांच्यासह ग्रामीण भागातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी चिन्ह चांगलेच लक्षात ठेवून वातावरण निर्मिती करण्याचा विडा उचललेला आहे.
तसं पाहिजे तर वाई- खंडाळा- महाबळेश्वर या तीन तालुक्याचा मिळून एक मतदार संघ झालेला आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये मदनराव पिसाळ आप्पा यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली त्यानंतर अपक्ष म्हणून मदन भोसले यांनी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवले होते. आता राजकीय संपूर्ण समीकरण बदललेले आहे आता राजकीय विरोधक आता महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. पण मतदारांना हा निर्णय पचलेला नाही. याची चुणूक या मेळाव्यात पाहण्यास मिळाली .
खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये समाचार घेताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे अनेकांना संधी मिळाली. या संधीचे त्यावेळी त्यांनी सोनं केलं पण आता राजकारणामध्ये स्वतःला कसं सोनं मिळेल. सत्तेच्या विडीच भीतीपोटी काहीजण या निघून गेले आहेत आता त्यांचे परतीचे दोर कापलेले आहेत. मतदारांच्या मनातील कौल दाखवण्यासाठी सर्वांनी सामुदायिक प्रयत्न केले पाहिजे. असे अनेक मान्यवरांनी बोलून दाखवले. या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट करताना ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत असलेली बाल मैत्री खासदार श्रीनिवास पाटील यांनी दाखवून दिली . त्यांच्या भाषणामुळे चांगलीच प्रेरणा मिळालेली आहे. कोणत्याही घरभेदी नेत्याचं नाव न घेता प्रमुख वक्त्यांनी तोफ डागली.
महायुतीच्या माध्यमातून सामान्यांना लुटण्याचे नूतनीकरण करण्यासाठीच ४०० पार असं वाक्य बोलले जात आहे. परंतु आता एकदा तडीपार करण्याची वेळ आली आहे. असे काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या मेळाव्याला प्रकाश पिसाळ, कैलास पाटील, निखिल चव्हाण, विजय जगताप, नरेश सोनवले , आण्णा खामकर, प्रदीप सावंत, संदीप कांबळे जयवंत बाबर, कृष्णा सावंत, निलेश ढेरे, राजाभाऊ खरात, भैय्या पिसाळ व वाई लोणंद खंडाळा पारगाव शिरवळ महाबळेश्वर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते