रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्या यांच्या निवडीने जल्लोष…

100

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : मुंबई येथे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष पॅंथर काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकसभा निवडणूक संदर्भात महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली . सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदी युवा नेते व दलित चळवळीतील आंदोलन विशाल भोसले यांची एक मताने निवड करण्यात आली त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य व तळागाळातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पक्षनिष्ठा व रिपब्लिकन सेना पक्षाकरिता असलेले योगदान आणि पक्षाचे काम ग्रामीण भागात रुजवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून विशाल भोसले यांच्या हातामध्ये पुनश्च जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे पत्र दिले . तसेच उपाध्यक्ष पदी नितीन रोकडे यांचीही यावेळी निवड करण्यात आली. उर्वरित जिल्हा कार्यकारणी लवकरच सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय करून जाहीर करण्यात येणार आहे.
या निवडीबद्दल ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १४ एप्रिल रोजी आहे यावेळी विशाल भोसले यांचा भव्य सत्काराचे नियोजन होते पण ते मोठ्या प्रमाणात न साजरा करता. विकास कामातून व आंदोलनातूनच साजरा करण्याचा निर्णय सर्वच कार्यकर्त्यांनी घेतला. आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्येक गाव वाड्या वस्तीला भेट देऊन त्या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी लवकर रिपब्लिकन सेना व सैनिक आघाडीवर राहतील असा विश्वास विशाल भोसले यांनी व्यक्त केला.

चौकट -सातारा जिल्ह्यामध्ये १४९६ गावे व वाड्या वस्ती आहेत. प्रत्येक गावामध्ये दलित शेतमजूर कष्टकरी पददलित मतदार आहेत या मतदारांची संख्या २ लाख ८५ हजार १५३ आहे. त्यापैकी किमान दीड लाख मत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणाऱ्या गटाकडे कायमस्वरूपी असतात. त्याचाच फायदा नेमका कुणाला होणार? हे लवकर स्पष्ट होईल. सातारा जिल्ह्यातील भीमाई स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण ज्या वास्तूमध्ये गेले ते राष्ट्रीय स्मारक व दलित वस्ती सुधार योजनेचा निधी योग्यरित्या प्रत्येक वाड्यावस्तीत जावे. यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार त्यात मला निश्चित यश मिळेल. अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हा अध्यक्ष विशाल भोसले यांनी दिली आहे.