रक्तविर सेनेच्या वतीने गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र युवा उमेदवार रिंगणात: 73 युवा उमेदवारांमधुन 03 संभाव्य उमेदवार यादी जाहिर

305

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी :- येत्या 19 एप्रिल ला गडचिरोली – चिमुर लोकसभा सदस्यांसाठी मतदान होणारं आहे. असे मुख्य निवडणूक आयोगाने जाहिर केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात रक्तविर सेनेचे उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणारं असुन रक्तविर सेनेच्या तगड्या समाजकार्याची एक वेगळी प्रतिमा आहे. गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्रासाठी रक्तविर सेनेकडे 73 युवा उमेदवारांची रांग लागली होती. त्यात त्यांना कठोर परीक्षेचा सामना करावा लागला आहे.
तुमची संपत्ती नको, तुमचे समाजकार्य महत्वाचे आहेत. तुम्ही जनतेचे नौकर म्हणुन लोकसभेचे अर्ज भरत आहात, मालक म्हणुन नाही हे लक्षात ठेऊन आपल्या भुमिका मांडाव्यात की निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय कराल. असे खडे बोल अध्यक्ष निहाल ढोरे यांनी उमेदवारांना सुनावले.

या लोकसभा महासंग्रामात 73 युवा उमेदवारांनी परीक्षा दिली, मात्र यात शिक्षण, समाजकार्य, वक्तृत्व अशा अनेक विषयाच्या आधारावर परीक्षा झाली. आणि 73 उमेदवारातुन 03 संभाव्य उमेदवार जाहिर कऱण्यात आले आहे. नियुक्त संभाव्य उमेदवार रितेश मडावी, अजयराज वलके आणि करण सयाम यांचे नाव अध्यक्ष निहाल ढोरे यांनी प्रसिध्द केली आहे. अशी माहिती उपाध्यक्ष मायासिंग बावरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

युवा वर्गाला प्रत्यक्ष राजकिय आधार देण्याच्या प्रयत्नात रक्तविर सेनेचे हे प्रयत्न मात्र नवलाचे आहेत. एकीकडे बलाढ्य नामचीन राजकारणी तर दुसरी कडे रक्तविर सेनेचे समाजकार्यात उतरलेले युवा उमेदवार, ज्यांची कोणतेही ओळख नाही. ते नामवंत नाही, ते श्रीमंत नाही मात्र रक्तविर सेनेच्या दांडग्या- तगड्या संपर्गामुळे हे उमेदवार ओळखायला येतील. हे सर्वस्तरावर चर्चेचा विषय आहे.