वाघाच्या डरकाळी ने क्रांती भूमी भयभीत..? वाघ वाचवा प्राणी मारा वनमंत्री व विभागाचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम. दोन बैलांचा वाघाने पाडला फडशा चिचाळा (कुणबी) शेतशिवारातील घटना.

617

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके
चिमूर प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील शंकरपूर पासून तीन किमी अंतरावरील चिचाळा कुणबी येथील शेतकऱ्याचे शेतात बांधून असलेल्या दोन बैलांना वाघाने जागीच ठार केले. ही घटना एकोणवीस मार्च च्या रात्री घडली यामुळे येथील शेतकऱ्यावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
चिचाळा कुणबी येथील शेतकरी गजानन संपत चौधरी यांनी आपले दोन्ही बैल शेतामध्ये असलेल्या बाभळीच्या झाडाखाली नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसातच्या सुमारास बांधून व बैलाला चारापाणी करून घरी आले. दुसऱ्या दिवशी गजानन चौधरी हे शेतामध्ये गेले असता त्याला दोन्ही बैल मृत्युमुखी पडलेले दिसले. त्यांनी इतरत्र फोन केला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता
चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन भाऊ ढोक घटनास्थळीत दाखल झाले व त्यांनी सूत्रे हाती घेतली व वन विभागाला फोन केले शंकरपूर येथील वन विभागाची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली व संपूर्ण घटनेचा पंचनामा केला . व वनविभागा तर्फ शेतशिवाऱ्याच्या परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत.
गजानन चौधरी यांचे अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन्ही बैल वाघाने खाल्ल्यामुळे त्यांचे वर आर्थिक संकट कोसळले आहे.

चंद्रपूर  जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतीश वाराजूरकर यांनी  संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली. व वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत द्यावी अशी सूचना केली.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर क्षेत्रामध्ये वाघाचे पाळीव प्राण्यावर हल्ले वाढत असून शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे
त्यामुळे वनविभागाने व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या वाढल्यामुळे चिमूर तालुक्यात मागील एक वर्षापासून वाघांचे ग्रामीण भागाकडे पलायन झाले असून त्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेचे व शेतकऱ्यांचा जीव गेला असून, त्यांच्या पाळीव प्राण्यावर सुद्धा जीवघेणा हल्ला वाढला असून त्यामध्ये त्यांचा पाळीव  प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. वाघ वाचवा मानस(जनता )मारा ही योजना वनमंत्री व वन विभागाची नाही ना.. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.