माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथील टीमची सदिच्छा भेट

38

 

पुसद : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ आणि गटसंसाधन केंद्र पंचायत समिती पुसद यांच्या संयुक्त विद्यमानेआयोजित प्रशिक्षण केंद्राला, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत गावंडे सर यांच्या मार्गदर्शनात, अधिव्याख्याता तथा राज्यस्तरावरील प्रशिक्षक व जिल्हास्तरावरील तज्ञ मार्गदर्शक मा. डॉ. किरण रापतवार मॅडम, राज्यस्तरावरील प्रशिक्षक तथा जिल्हास्तरावरील तज्ञमार्गदर्शक मा. अमित ठोकळ सर आणि राज्यस्तरावर प्रशिक्षक व जिल्हास्तरावरील तज्ञ मार्गदर्शक तथा समुपदेशक मा. किशोर बनारसे सर यांनी, पुसद येथे सुरू असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.

त्यावेळी मंचावर राज्यस्तरावरील प्रशिक्षक तथा जिल्हास्तरावरील तज्ञमार्गदर्शक मा .शिवशंकर घरडे सर, तालुका स्तरावरील तज्ञ मार्गदर्शन मा.डॉ.आशिष देऊळकर सर उपस्थित होते.
त्याप्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थींना डॉ. किरण रापतवार मॅडम यांनी मार्गदर्शन केले . यावेळी तालुका स्तरावरील तज्ञमार्गदर्शक भास्कर गरड, संतोष चव्हाण, जयवंत मोटे ,दीपक डोईफोडे ,किशोर गांजरे ,नईम सर ,कु.गीता उडाके, डी.बी. सरकटे, उमेश डोंगरे श्री ठाकरे सर,भारत शेरे, अभय सावकार, महादेव गावंडे, एम एस काईट, बंडू मंदाडे आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकास्तरावरील तज्ञमार्गदर्शक प्राध्यापक श्री भास्कर गरड यांनी केले तर आभार तज्ञ मार्गदर्शक श्री किशोर गांजरे यांनी मानले.
या प्रशिक्षणाचे उत्कृष्ट आयोजन पंचायत समिती पुसदच्या गटशिक्षणाधिकारी मा. सुशीला आवटे मॅडम यांच्या मार्गदर्शनात बीआरसी पुसद चे श्री रामभाऊ रोगे,लक्ष्मण वाघमारे , दीपक सारंगे , अनिता पावडे मॅडम यांनी केले.