राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे धरणगाव महाविद्यालयात शहिदी दिनानिमित्त एक दिवसीय स्वच्छता अभियान व मतदान जनजागृती मोहीम

46

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव – युवा मंत्रालय आयोजित व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव तर्फे स्वच्छता अभियान व शहीदी दिनानिमित्त मतदान जनजागृती या विषयावर एक दिवसीय शिबिर 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते.

सकाळ सत्रामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्लास्टिक, कागदाचे तुकडे गोळा करून महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला.दुपारच्या सत्रामध्ये शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प .रा.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुणजी कुलकर्णी हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर सोसायटीचे सचिव डॉ. मिलिदजी डहाळे, धरणगाव तहसीलचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजय शिंगाणे उपस्थित होते.

प्रमुख वक्ते तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी इ. व्ही. एम. मशिन कसे काम करते याचे मार्गदर्शन केले.18 वर्ष पूर्ण झालेले सर्व तरुणांनी मतदान करण्यासाठी नाव नोंदणी करावे असे आवाहन केले.तसेच नोंदणी, नावात बदल,मतदान गाव बदल अशा विविध गोष्टी साठी वेगवेगळे फॉर्म निवडणूक कक्षा मध्ये मोफत उपलब्ध असतात याचा आवशक तिथे लाभ घ्यावा असे आवाहन केले . प्रा.डॉ.संजय शिंगाणे यांनी जगातील सर्वात मोठी व सशक्त लोकशाही भारतात आहे व त्या साठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
डॉ.मिलिंदजी डहाळे यांनी स्वच्छतेचे महत्व विषद केले. जेवणा आधी हात धुणे, नख तोंडाने न काढणे या सारख्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपले आरोग्य सुदृढ ठेऊ शकतो असे मत व्यक्त केले.

अध्यक्ष समारोपात डॉ.अरूणजी कुलकर्णी यांनी रक्तदान ,अवयवदान सोबत मतदान करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन डॉ.गौरव महाजन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजीत जोशी, डॉ ज्योती महाजन यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवक स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.