म्हसवड शहरात चिमुरड्यांसह तरुणानी केली रंगपंचमी उत्साहात साजरी

623

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : शनिवारी म्हसवड शहरात रंगपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळपासून शहराच्या विविध भागांत बालचमू, महाविद्यालयीन युवक विविध रंग भरलेल्या पिचकाऱ्या घेऊन एकमेकांना रंगवत होते. काही युवकांनी चेहरे रंगवले होते.म्हसवड शहरात रंगपंचमीनिमित्ताने सकाळपासून मोठा उत्साह दिसून आला. तथापि, दुपारी उन्हाचा कडाका असल्यामुळे रंगपंचमीचा उत्साह कमी दिसला. मात्र, दुपारनंतर पुन्हा अनेक बालचमूंनी पिचकारी हाती घेतली व रंग खेळले.
शहरात बाळगोपाळ विविध रंगांनी रंगले होते. कोणी बाटलीत रंग बनवून, तर कोणी पिचकारीने रंग उडवून आनंद घेत होते. मोठ्यांनीही रंगपंचमी साजरी केली. शांततेत, आनंदात, उत्साहात हा सण शहरात साजरा करण्यात आला. सर्वत्र धम्माल अनुभवास मिळत होती.
बालचमूंपासून आबालवृद्धांपर्यंत साऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. दुपारी ४ नंतर रंगपंचमीचा उत्साह शिगेला
पोहोचलेला पाहायला मिळाला. बालचमूंनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारीमधून रंग उडवत रंगपंचमी साजरी केली. तर तरुणाईने कोरडे रंग वापरत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. अनेक ठिकाणी महिलाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या दिसल्या. पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षी रंगपंचमीत पाण्याचा वापर जास्त झालेला दिसला नाही. महावीध्यालयीन तरुण रंग खेळून झाल्यानंतर सेल्फी काढण्याचा आनंद घेत होती तर रंगपंचमी सणात कोठेही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.