गंगाखेड नगर परिषद दोन कोटी अपहार केलेल्या तक्रार प्रकरणी, (अवर सचिव महाराष्ट्र शासन) जयंत वाणी यांनी दिले चौकशी आदेश

679

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेडः गंगाखेड नगर परिषद माध्ये खोटी देयके सादर करून मोठ्या प्रमाणात नगर परीषद निधीचा अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून बडतर्फ करण्याची तक्रार दिनांक ०६/०३/२०२४ रोजी कऱण्यात आली होती.या प्रकरणी (अवर सचिव महाराष्ट्र शासन) जयंत वाणी दखल घेतली असून या प्रकरणी जिल्हा अधिकारी परभणी यांना नियमा नुसार उचित कार्यवाही करून संबंधितांस अवगत करावे ,तसेच या प्रकरणी शासनस्तरावर कार्यवाहीची आवश्यकता असल्यास, त्या प्रमाणे वस्तुनिष्ठ स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे.
या प्रकरणी प्र तत्कालीन प्रशासक सी .ओ. तुकाराम कदम लेखाधिकारी जुबेर व लिपीक सुरेश मणीयार यांनी चक्क विकास काम न करताच खोटी देयकातुन दोन कोटीचा अपहार केल्याने यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतुन बडतर्फ करण्याची मागणी संतोष टोले यांनी केली होती