निंगणुर येथे तरुणीची छेडछाड जिवेमारण्याच्या धमकीसहीत जातीवाचक गुन्हे दाखल

  279

   

  ✒️ सिध्दार्थ दिवेकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

  उमरखेड :- (दि.19 एप्रिल) घरच्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जात असताना एका तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करत, जिवेमारण्याची धमकी व छेडछाड करण्याचा गंभीर प्रकार तालुक्यातील निंगणुर येथे घडल्याचे उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणी गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

  कैफ खान उर्फ मुजीब खान , रहैबर खान अकबान खान , सुमेर खान अफसर खान , अफसर खान भुरे खान राहणार सर्व निंगणुर असे आरोपींची नावे आहेत.

  फिर्यादी नुसार तालुक्यातील निंगणुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या घरच्या सोबत जात असलेल्या युवतीला कैफ खान या १९ वर्षीय युवकाने प्रेम भावना व्यक्त करत तिचा हात पकडण्याचा गंभीर प्रकार घडला.

  दरम्यान ह्याला विरोध करताच आरोपींनी जाती वाचक शिवीगाळ करून एकटी भेटल्यावर तुला संपवुन टाकण्याची भाषा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  काहींच्या मध्यस्थीने हा पुढील प्रकार टळला असुन आरोपींनी तेथुन पळ काढला.

  सदर प्रकरणाची दुसऱ्या दिवशी नातलगांच्या मदतीने युवतीने बिटरगाव पोलिसांत घडलेल्या प्रकारावरून वरील आरोपी विरुद्ध तक्रार दिली आहे.

  सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४,५०४,५०६ सह अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार आरोपीची शोधमोहिम हाती घेतली आहे.

  प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रेम केदार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.