सम्यक पुणे ग्रुपच्या वतीने “विकासाचे राजकारण ” या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण

390

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :-परभणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाबराव डख यांच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या समोर पुणे येथील सम्यक ग्रुप यांनी पथनाट्याचे सादरीकरण करत असताना वंचित बहुजन आघाडीची भूमिका नाट्यमय शैलीतून व्यक्त केली व गंगाखेड शहरातील पाहणाऱ्या प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आकाश पारवे, गजानन पारवे, दिगंबर घोबाळे, लखन साळवे,इत्यादींची उपस्थिती होती. निवडणूक प्रचार करत असताना सम्यक पुणे ग्रुपच्या वतीने “विकासाचे राजकारण ” या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले असता पुणे येथील सम्यक ग्रुपच्या पथनाट्य मध्ये ओंकार भुसारे, शेवता सुतार,शिवम कदम, मनोज पर्धे ,किशोर परधे, कौशिक , भाग्यश्री कोंबे,पूजा लोंढे, वनिता नाईयक, हिना शेख यांचाही सहभाग होता