दहागाव येथील महिलांनी केले पुरुषांच्या बरोबरीने मतदान..!

118

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड
हिंगोली लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या जवळपास 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आचार संहिता लागू झाली अशातच प्रचार सुरू झाला परंतु ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे लोकांच्या समस्या जाणून घेऊन प्रत्येक गावा-गावामध्ये मतदान वाढून आपल्याच पक्षाचा विजय व्हायला पाहिजे त्या करिता मतदान जागृती किंवा पक्षा मार्फत होणाऱ्या विकास कामाची यादी दाखऊन मतदान ओढून आणण्याचे काम करताना जास्त प्रमाणात कुठल्याच पक्षाचे राजकारणी दिसत नव्हते.

तरीही हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये येत असलेले दहागाव या गावातील काही सुज्ञ मतदार आपण आपल्या मताचा अधिकार गाजवला पाहिजे आणि त्याचा योग्य उपयोग करून 100% मतदान पूर्ण करून योग्य तोच मतदार निवडून दिला पाहीजे यासाठी आपले कर्तव्य बजावत होते. त्यामधे मा. रुस्तुम कदम तसेच मा.आत्तदिप धुळे यांच्या सिंहाचा वाटा होता. यांच्या मतदान जागृती मुळेच हिंगोली लोकसभेतील बूथ क्रमांक (188) दहगाव येथील एकूण 640 मतदरांपैकी बाहेरगावी असलेल्या 100 मतदार वगळता 407 मतदान पूर्ण झाले त्यापैकी 204 पुरुष तर 203 महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला..