रुतिक भोंगाडे यांची यवतमाळ जिल्हा संघटक पदी निवड

64

 

यवतमाळ (जिल्हा प्रतिनिधी) :- कळंब तालुक्यातील वाढोणा ( खुर्द ) येथील रहिवासी युवा सामाजिक कार्यकर्ते रुतिक भोंगाडे यांची राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ या सामाजिक संघटनेच्या यवतमाळ जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून यांना राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासघांचे मुख्य संयोजक रूस्तम शेख याच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

जिल्हा संघटक पदी नियुक्ती केल्या बद्दल नवनिर्वाचित जिल्हा संघटक रुतिक भोंगाडे यांनी यवतमाळ जिल्हा संयोजक शाहरुख काजी, मुख्य संयोजक रुस्तम शेख तसेच सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले .

संघटनेच्या माध्यमातून मी समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हा संघटक रुतिक भोंगाडे यांनी आमचे प्रतिनिधी कडे व्यक्त केली