माढा लोकसभा मतदार संघात भाजपाकडून शंभर कोटींचे वाटप : बसपा उमेदवार स्वरूप जानकर

332

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : माढा लोकसभा मतदार संघात काल मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत भाजपाकडून शंभर कोटी रुपयांचे वाटप केल्याचा आरोप बसपा चे उमेदवार स्वरूप जानकर यांनी केला आहे.
यावेळी बोलताना जानकर. म्हणाले मी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघांमध्ये काम करतोय वीस वर्षाच्या कालावधीमध्ये मला लोकसभा निवडणुकीत अशी कुठली दिसली नाही की ज्यामध्ये ग्रामपंचायती सारखं पैशाचं वाटप झाल माझ्या माहितीप्रमाणे भ्रष्ट जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसारखा जवळपास 100 कोटींचा खुर्द उडवलाय असं माझं मत आहे कारण मी मान तालुक्यामध्ये फिरत असताना प्रत्येक गावामधून कुठे पाच लाखाचा वाटप, कुठे आठ लाखाचा वाटप कुठे दहा लाखाचं वाटप झाले आहे मतदाराला एक हजार, दोन हजार, पाच हजार रुपयानी पैसे वाटप झाले आहे अशा पद्धतीचे सगळे लोकशाहीच्या विरोधी सगळं वातावरण होतं लोकांना विकत घेणारं वातावरण होतं आणि ते अतिशय मला धक्कादायक वाटलं त्यामुळं मी सकाळी ऑफिसर इलेक्शन कमिशन महाराष्ट्र यांनाच्याकडे ई मेल द्वारे तक्रार दिली आहे.
हा सगळा प्रकार लोकशाही व्यवस्थेला आव्हान आहे घटनात्मक दृष्ट्या भारतीय राज्यघटना दुबळी झाली तर इथला बहुजन समाज दुबळा होणार आणि बहुजन समाज सशक्त झाला पाहिजे इथली लोकशाही सशक्त झाली पाहिजे ही माझी भावना आहे त्यामुळे आणि त्यासाठीच मी मैदानात उतरलो होतो आणि भाजपला रोखताना राज्यघटनेचे संरक्षणाची भूमिका करताना ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे राज्यघटना लिहिली ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हत्ती चिन्हावर निवडणूक लढवली त्यामुळे बहुजन समाज पार्टीला मी प्राधान्य देऊन या निवडणुकीत मी लढण्याचा निर्णय घेतला. अनेक प्रस्तावित पक्षांकडून चर्चेचा निमंत्रण आले होते परंतु माझ्या कुटुंबाचा असलेला संघर्षाचा वारसा हा पुढे चालवणार.