🔸वरुड आगार प्रमुख श्री.जिवन वानखडे यांनी दिली माहिती

✒️शेखर बडगे(अमरावती प्रतिनिधी)

अमरावती(दि.6ऑगस्ट):-कोविड १९ (कोरोना) च्या वैश्विक माहामारिमुळे एस. टि. महामंडळाच्या गेल्या ४ महिन्यापासून बंद असलेल्या गाड्या आता अमरावती आगारा पर्यंत धावणार असल्याचे वरुड आगाराचे आगार प्रमुख श्री.जिवन वानखड़े यांनी सांगितले.
कोरोना चा फैलाव जास्त होत असल्यामूळे गेल्या काहीदिवासापासुन बसेस सुरू होत्या,परंतू त्या काही फ़क्त वरुड ते मोर्शी तर काही वरुड ते नांदगाव पेठ पर्यंतच होत्या परंतू आता त्याच बसेस म.न.पा.आयुक्तांच्या यांच्या परवानगीने आता वरुड ते अमरावती आगारापर्य्ंत धावणार असल्याचे आगार प्रमुख जिवन वाणखड़े यांनी सांगीतले आहे.तसेच दर एकातासाने धावणार असुन प्रवाश्यांनी फार मोठया प्रमाणात फ़ायदा घेण्याचे आव्हान श्री.वानखड़े यांनी केले आहे

अमरावती, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED