सोन्याच्या अंगठी साठी २२ वर्षीय नवविवाहितेचा छळ करून खून

  40

  ?सिरसाळा पोलिस ठाण्यात सासू, सासरा, पती विरुद्ध गुन्हा दाखल

  ✒️ आतुल बडे(परळी वैजनाथ,तालुका प्रतिनिधी)मो:-9096040405

  परळी(दि.6ऑगस्ट):-तालुक्यातील सिरसाळा पासून जवळच असलेल्या आचार्य टाकळी येथील पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,पाडूळी ता. तालुका परळी वै.येथील मनिषा साहेबराव काळे वय २२ वर्ष हीच विवाह आचार्य टाकळी तालुका परळी वैजनाथ येथील जगन्नाथ संदिपान आचार्य यांच्यासोबत दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी रीतीरिवाजाप्रमाणे करण्यात आला होता. परंतु लग्नांमध्ये सासूला अंगठी घातली नाही असे म्हणून विवाहित मनीषा हिला पती सासरे आणि सासू हे तिघेजण सतत अंगठी करण्यासाठी दोन लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन ये अशी मागणी मनीषा कडे करत होते. परंतु मुलीच्या वडिलांची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते अंगठी साठी पैसे देऊ शकले नाहीत.

     परंतु यासाठी या तिघांकडून सतत छळ करत होते. सदर छळा बाबत मुलीने फोनवरून वेळोवेळी सांगितले तर दि.२३/७/२०२०रोजी पंचमी निमित्त माहेरी आली असता आपल्यावर होणाऱ्या मारहाणीबाबत आई वडिलांना सांगितले तर आपन तिन महिन्याची गरोदर असल्याचेही आईला सांगितले होते. असे असतानाही आई आपल्याच मुलीची समजूत काढून ३०/७/२०२० रोजी सासरी आचार्य टाकळी येथे नेऊन सोडले होते. परंतु या ही वेळी तिचा पती जगन्नाथ याने तु मंगळवारीच माहेर येऊन परत का आली नाही म्हणून कमरेच्या बेल्टने मारहाण केली. याचीही माहिती हिंदी मे आम्हाला फोन वरून आम्हाला सांगितली होती.परंतु दि.५/८/२०२०रोजी सकाळी ७:०० वाजता जावई जगन्नाथ आचार्य यांचा चुलत भाऊ संतोष आचार्य याने फोन करून तुम्ही टाकळीला ताबडतोब या तुमची मुलगी सिरीयस आहे. असे सांगितल्यावरून आम्ही गावातील मोहन मोहन व्यंकटराव बडे याची मोटरसायकल घेऊन आचार्य टाकळी येथे गेलो असता. माझी मुलगी मनीषा तिचे प्रेत तिच्या बेडरूममध्ये जमिनीवर पालथ्या अवस्थेत झोपले होते आणि ते प्रेत कपड्याने झाकलेले होते सदर प्रेताची पाहणी केली असता तिच्या दोन्ही हातावर कपाळावर कमरेवर दोन्ही बाजूने मारल्याच्या जखमा होत्या तसेच छातीवर डाव्या उजव्या हाताच्या बोटावर पायावर मारहाण केल्याचे काळसर वन दिसून आले तर तिच्या तोंडामध्ये कापसाचा गोळा आढळून आला याप्रकरणी सिरसाळा पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचून घटनेचा पंचनामा केला व मनीषा चे प्रेत आंबेजोगाई रुग्णालय येथे पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले.

         त्याचा अहवाल रात्री उशीरा आल्यानंतर आरोपी पती,सासरा,सासू या तिघांविरुध्द गु.र.न.२१६/२०२०कलम ३०२,४९८अ,२०१,५०४,५०६,३४ भादवी सह कलम ३,४ हुंडा प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार पोलीस त्यांच्या शोधात आहेत. दरम्यान परळी तालुक्यासह जिल्हाभरात महिलावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.