दिव्यांग बांधवाना समाज कल्याण अधिकारी व नायगाव तहसिलदार यांच्याकडून वैयक्तिक मदत

  370

  “कोरोना सारख्या संकटकाळी दिव्यांग बांधवाना,दिनदुबळ्याना समाज कल्याण अधिकारी व नायगाव तहसिलदार यांच्याकडून वैयक्तिक मदत देऊन आदर्श घडविला. प्रशासनात यांचा सारखे अधिकारी असल्यास समाज उच्च स्तरावर पोहचेल. या उपक्रमातून इतर अधिरार्यांनी प्रेरणा घेऊन काम केल्यास समाज त्यांचा मान व सन्मान करेल-चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर”

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.7ऑगस्ट):-आज देशातील आलेल्या संकटांना दिव्यांग, वृध्द निराधार याना खुपच हाल अपेष्ठा होऊ नये म्हणून शासनाने अनेक शासन निर्णय योजना जाहीर केल्या त्यात ज्या दिव्यांग वृध्द निराधार याना उपासमार होउ नये म्हणून अनेक योजना जाहीर केल्या पण ते आदेश कागदोपञीच आहेत.

  दिव्यांग आयुक्त पुणे यांनी दिनांक 26 मार्चला आदेश देऊन सुध्दा त्यांची अंमलबजावणी केली जात नसुन दिव्यांग संस्थापक चंपतराव डाकोरे यांच्या विनंतीस व दिव्यांग बांनवाबद्दल असलेली आपुलकी मुळे मा समाजकल्याण अधिकारी सत्येंद् आयुलवार साहेब यानी शासनाचा निधीची वाट न पाहता आपल्या सर्व कर्मचार्याच्या मदतीने नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधताना भाजीपाला किट घरोघरी वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले.

  तसेच नांदेड शहरातील कौठा येथील नगरसेवक मा.राजु गोरे साहेबानी डाकोरे पाटिल यांच्या विनंतीस मान देऊन शहरातील दिव्यांग बांधताना धान्य किट देऊन दिव्यांगा बदलची आस्था दाखऊन दिली

  नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार साहेब पैकी नायगाव तालुक्यातील मा कर्तव्यदक्ष तहसिलदार मा सुरेखा नांदे मँडम यांनी शासनाच्या निधीची वाट पाहता संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या केलेल्या विंनतीवरून नायगाव तालुक्यात सर्व महसुल कर्मचारी यांच्या मदतीने दिव्यांग बांधताना 201 राषण किट देऊन प्रशासकीय अधिकारी यांच्या उदार अंतकरण व दिव्यांग बाधवाना वरील प्रशासकीय अधिकारी यानी मदत करुन दिनदुबळ्या दिव्यांग बांधताना आपल्या वैयक्तिक स्वरुपाची मदत केल्याबद्दल ईश्वर अशीच बुध्दी वरील प्रशासकीय व लोकप्रतिनिधी यांना संकटकाळी मदत करण्याची सद्बुद्धी प्राप्त होऊन आपण जनतेला परोपकार करण्याची भावना उत्पन्न होत हिच आशा व्यक्त करतो.

  दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, कुंचेलीकर . विठल बेलकर. शंकर शिंदे. वैजनाथ हतिनगरे आदी उपस्थित होते.