पत्रकारांवर होणारे हल्ले व अत्याचार विरोधात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे वरूड पोलीस स्टेशन ला जाहीर निवेदन

28

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.14ऑगस्ट):-पत्रकार हा लोकशाही चा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. समाजात घडत असलेल्या घडामोडी , अन्याय-अत्याचार , पिळवणूक , तसेच जनतेच्या भावना ठामपणे मांडत असतांना आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक पणे सामाजिक बांधिलकी जपत असतांना समाजातील काही विकृत लोक पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात. त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात,वेळप्रसंगी त्यांना जीवे ठार सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला जातो. असाच प्रकार माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सिंदेवाही तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष तथा इंडिया २४ न्यूज चॅनल चे विशेष जिल्हा प्रतिनिधी अरुण मादेश्वार हे स्वतः च्या मुलासह आपल्या वयक्तिक कामाकरिता गुंजेवाही मार्गे सिंदेवाहिला जात असतांना पाळत ठेऊन असलेल्या काही समाजकंटकांनी रस्त्यात त्यांच्या दुचाकीला आडवे येत त्यांना व त्यांच्या मुलाला मारहाण केली.

अरुण मादेश्वार हे सिंदेवाही तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा इंडिया २४ न्युज चॅनल , वेब पोर्टलचे जिल्हा प्रतिनिधी आहेत तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सिंदेवाही तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ०९ मे २०२० रोजी सिंदेवाही तालुक्यातील तलाठी साजा क्र. १९ मध्ये येत असलेल्या खैरी (चक) गटातील गट क्र. ९५ अवैध वृक्षतोड करून वनविभागाच्या जागेवर शेती काढत असल्याचे गंभीर प्रकार उघडीस आणून आपल्या इंडिया २४ न्यूज वेब पोर्टल ला बातमी लावली. या बातमीमुळे चौकशी सुरु झाल्यामुळे अनेकांची धडकी भरली. या संबंध बाबीचे राग मनात धरून मरेगाव परिसरातील अंबादास दुधे , त्यांची पत्नी , देव्हारे व त्यांची पत्नी , तसेच दोन अन्य इसम व दोन महिला असे आठ स्त्री-पुरुषांनी जंगलात दुचाकी थांबवून आमच्या प्रकरणाची बातमी का लावली असा प्रश्न विचारत अरुण मादेश्वार यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. आणि त्यांच्या खिशातील मोबाईल फोन, घड्याळ , व त्यांच्या मुलांचे शैक्षणिक कागदपत्रे हिसकावून घेतली. या मारहाणीत त्यांना डोक्याला , हाताला , पाठीला व मुलाला किरकोळ मार लागलेला आहे. सदर घटनेचा आम्ही जिल्हाभरातील पत्रकार मंडळी तीव्र निषेध नोंदवून आरोपींना पत्रकार अँक्ट नुसार तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत. दिवसेंदिवस पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्राणघातक हल्ल्यामुळे लोकशाहीचे चौथे म्हणून आपली भूमिका मांडणारे आम्हा पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहेत. याकडे वेळीच लक्ष वेधून आपण जिल्ह्यात पत्रकारांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे अशी विनंती माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक तथा अध्यक्ष अभिजीत आपटे , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप कांबळे, अमरावती जिल्हाध्यक्ष शेखर बडगे यांना मार्गदर्शनाखाली माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वरूड तालुक्याचे पदाधिकारी हेमंत कोंडे तालुकाध्यक्ष , धनंजय गायकी तालुका संघटक , सागर चोरकर तालुका उपाध्यक्ष , प्रणय लोखंडे सचिव , रोशन गावंडे सहसचिव , योगेश बघेले सदस्य , रोशन बरडे सदस्य यांनी पोलीस वरुड येथे निवेदन देत पोलीस प्रशासनाला विनंती केली.