🔺संगमनेर तालुक्यातील घटना

✒️आदेश उबाळे(विशेष प्रतिनिधी)मो:-9823503547

संगमनेर(दि.14ऑगस्ट):-संगमनेर तालुक्यात विवाहितेला धमकावून दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या डॉक्टरवर घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. सय्यद दाऊद मोमीन (सारोळे पठार) असे त्याचे नाव आहे.
डॉ. मोमीनकडे उपचार सुरू केले. सलाईनमधून गुंगीचे औषध देत त्याने या महिलेवर अत्याचार केले.
मोबाइलवर चित्रफीत काढून धमकावत कुटुंबीयांना दाखवण्याची व व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. डॉ. सय्यदने तिच्यावर दोन वर्षांपासून सारोळेपठार व संगमनेरच्या लॉजवर अत्याचार केले.
शनिवारी दुपारी कुक्कुटपालन शेडमध्ये बोलावून शरीरसंबंधाची मागणी करत मारहाण करण्यात आली.
नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून मुलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. या छळास कंटाळून विवाहितेने अखेर पोलिसात फिर्याद दिली.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED