चेक बल्लारपूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

28

🔹चेक बल्लारपूर येथील ग्राम परिर्वतन युवा संघटना, ग्राम पंचायत, गावकरी यांचा पुढाकार

✒️पोंभुर्णा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पोंभुर्णा(दि.16ऑगस्ट):-वृक्ष आमचे मित्र, वृक्ष आमचे पुत्रजातीभेद करूनी वेगळा, तयांना वाचवू मिळूनी सगळे,
या राजकारणी दुनियेने, चढवली तयांना फाशी,
आपण सगळे मिळूनी, वाचवू तयांना तासी- तासी,
हे मानवा आता तरी उघड डोळे, नाही तर होईल गावाचे वाटोळे-वाटोळे‌.

आपल्या भारताची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतशी झाडेसुद्धा कमी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे आपण पाहत आहोत. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदुषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे. म्हणून *’झाडे लावा झाडे जगवा’* ही संकल्पना राबविली जात आहे. 

चेक बल्लारपूर येथील ग्राम परिर्वतन युवा संघटनानी ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चेक बल्लारपूर येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले होते. दि.१५ ऑगस्ट २०२० (७४ व्या स्वातंत्र दिनाच्या) निमित्ताने वृक्षारोपण अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.

उठ तरुणा जागा हो, ऑक्सिजनचा धागा हो.

एक व्यक्ती, एक झाड, एक कठळा या प्रमाणात राबण्यात आलं या मध्ये गावातील युवा संघटना, ग्राम पंचायत कर्मचारी, तसेच गावकरी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण अभियान कार्यक्रम पार पडला.